‘या’ पौष्टिक आणि कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, वजन घटवा!

बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे.

'या' पौष्टिक आणि कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, वजन घटवा!
आहार

मुंबई : बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे. आपल्याला कदाचित माहिती असेल की, जास्त कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्याने चरबी वाढते. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आहारात प्रथिने, कमी कॅलरी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचा आहारात समावेश करा. (Include these nutritious and low calorie foods in your diet)

आपल्या आहारात बेरी, द्राक्षे, सफरचंद, खरबूज, ब्रोकोली, फुलकोबी, सोयाबीन, गाजर, बीट्स इ. समाविष्ट करा. या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या पौष्टिक असतात आणि त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण देखील कमी असते. हे आपल्याला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. द्राक्ष खाल्ल्याने शरीरात ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर ठरतात.

रंगीबेरंगी बेरी आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. या बेरीजमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. बेरीमध्ये कॅलरी कमी, तर फायबर जास्त आहे. त्यामुळे पचन क्रिया देखील सुधारते. खरबूज खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर आहारात खरबूज नक्की सामील करा. खरबूजमध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत.

विशेष म्हणजे खरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे सी असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. विशेष म्हणजे ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होते आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तर ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

फ्लॉवरमध्ये शरीरासाठी फायदेशीर असणारं कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. 100 ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील 77 टक्के, व्हिटॅमिन Kचे 20 टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 6 असतं.

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Include these nutritious and low calorie foods in your diet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI