Weight Loss: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘या’ प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा!

जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो. तेव्हा प्रत्येकाला प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्याचे महत्त्व कळते. प्रथिन्यांचा आहारात समावेश केल्याने बराच वेळ आपले पोट भरलेले राहते आणि स्नायू वाढण्यास मदत होते. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये कमीत-कमी दररोज 1 ते 1.5 ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये 'या' प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 8:38 AM

मुंबई : जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो. तेव्हा प्रत्येकाला प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्याचे महत्त्व कळते. प्रथिन्यांचा आहारात समावेश केल्याने बराच वेळ आपले पोट भरलेले राहते आणि स्नायू वाढण्यास मदत होते. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये कमीत-कमी दररोज 1 ते 1.5 ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ घेतल्याने आपल्याला दुपारपर्यंत भूक देखील लागत नाही आणि आपले चयापचय देखील वाढण्यास मदत होते.

1. अंडी

वाफवलेले, ऑम्लेट किंवा सनी-साइड अप अशा अंड्यापासून तयार केलेले पदार्थ तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये समाविष्ट करू शकता. अंडी हा उच्च दर्जाच्या पूर्ण प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. ज्याचा तुम्ही तुमच्या प्रथिनांचे सेवन वाढवण्यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

2. ओट्स इडली

आपल्या दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी तांदूळ किंवा रव्याऐवजी ओट्स वापरुन गरमागरम इडली बनवू शकता. ओट्समध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ही इडली सांबार आणि नारळ चटणीसह सर्व्ह करू शकता.

3. दलिया

एक वाटी गरम दलिया, एक चमचा नट बटर, काही ताजी फळे आणि ड्राय फ्रूट्स हे नाश्त्यामध्ये घेतल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. दलियामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर, तांबे, लोह आणि जस्त यांसारखे इतर पोषक घटक असतात. हे पोषक घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात.

4. फ्लेक्ससीड

या लहान बिया प्रथिने समृद्ध असतात. आपण आपल्या नियमित आहारात फ्लेक्ससीडचा समावेश करू शकता. आपण रायतामध्ये या बिया समाविष्ट करू शकता. ग्राउंड फ्लेक्ससीड दहीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.

5. पोहे

पोहे हे एक आरामदायी अन्न आहे आणि त्यात थोडे शेंगदाणे टाकल्याने ते प्रथिनेयुक्त जेवण बनते जे सकाळी खाऊ शकता. तुमचे पोहे अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात थोडे वाटाणे, कांदे, बटाटे आणि फुलकोबी घाला. मधल्या जेवणाची भूक कमी करण्यासाठी तुम्ही दुपारचा नाश्ता म्हणून पोहे देखील खाऊ शकता.

6. मूग डाळ चिला

मूग डाळ चिला आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मूग डाळीमध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, डी, ई, प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणाच्या वेळेत अनारोग्यकारक पदार्थ खाणे टाळण्यासाठी आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मूग डाळ चिल्याचा आहारात समावेश करा.

7. नट्स

बदामापासून अक्रोड आणि काजू पर्यंत सर्व प्रकारच्या नट्समध्ये प्रथिने भरपूर असतात. सकाळी एक वाटी नट्सचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. विविध खाद्यपदार्थांमध्ये आपण बदाम, अक्रोडचा समावेश करू शकतो.

संबंधित बातम्या : 

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Include these protein rich foods in breakfast and lose weight)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.