Health Tips : एकदा बनवलेला चहा परत परत गरम करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक, वाचा!

आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. आपल्यापैकी बहुतेकांना त्याची अद्भुत चव आवडते. चहा पिल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. ते आपली ऊर्जा वाढवण्यास मदत करते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा पिला जातो.

Health Tips : एकदा बनवलेला चहा परत परत गरम करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक, वाचा!
चहा

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. आपल्यापैकी बहुतेकांना त्याची अद्भुत चव आवडते. चहा पिल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. ते आपली ऊर्जा वाढवण्यास मदत करते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा पिला जातो. मात्र काही लोकांना आवश्यकतेपेक्षा जास्त चहा पिण्याची सवय असते. (Know the reason why you should avoid drink reheated tea)

आपण बऱ्याच वेळा चहा तयार करण्यासाठी आळस करतो. ज्यामुळे आपण एका वेळी मोठ्या प्रमाणात चहा तयार करून ठेवतो. तो एकदाच तयार केलेला चहा आपण दिवसातून अनेक वेळा फक्त गरम करून पितो. पण तुम्हाला माहित आहे का की पुन्हा पुन्हा गरम चहा करून प्यायल्याने आरोग्याला मोठे नुकसान होते. एकाच वेळी चहा तयार करून परत गरम करून पिण्याचे आरोग्याला कोणते नुकसान होते हे आपण बघणार आहोत.

चव आणि वाईट वास

चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याची चव आणि सुगंध नष्ट होतो. या दोन्ही गोष्टी चहामध्ये खास आहेत. याशिवाय, चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याचे पोषक घटकही कमी होतात.

जीवाणूंची वाढ

एकदाच चहा तयार करून पुन्हा पुन्हा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण चहामध्ये सूक्ष्मजीव तयार होऊ लागतात. हे सौम्य जीवाणू आरोग्यासाठी हानिकारक असतात. ज्या घरांमध्ये दुधाचे प्रमाण जास्त असते तेथे दुधाचा चहा बनवला जातो. यामुळे सूक्ष्मजीव धोका वाढतो. त्याच वेळी, हर्बल चहा वारंवार गरम केल्याने त्याचे पोषक घटक नष्ट होतात.

आरोग्यासाठी हानिकारक

एकदाच तयार केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिणे आरोग्यासाठी घातक आहे. कारण त्यात असलेले पोषक तत्व संपतात. जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर बराच वेळानंतर पोटदुखी, जळजळ होऊ शकते. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चहाशी संबंधित या गोष्टी जाणून घ्या

1. जर तुम्ही 15 मिनिटांनी चहा गरम केलात तर ते तुम्हाला हानी पोहोचवत नाही.

2. बराच वेळानंतर चहा परत गरम करून पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

3. चहा नेहमीच ताजा तयार करा आणि गरम असताना लगेचच प्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Know the reason why you should avoid drink reheated tea)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI