World Record | सलग १०० तास स्वयंपाक बनवण्याचा गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या शेफच्या नावावर

एखाद्याला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हटलं जातं, जेवण बनवणं ही एक साधनाच आहे. स्वयंपाक बनविणाऱ्याच्या हाताला चव असते असे उगाच म्हटलं जात नाही, तर अशा पाककलेत कोणी केलाय रेकॉर्ड पाहा.

World Record  | सलग १०० तास स्वयंपाक बनवण्याचा गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या शेफच्या नावावर
Guinness World RecordImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 12:55 PM

लागोस : जेवण त्यात चहा आणि पोहे बनवण्याचे जरी मनावर घेतले तरी अनेकांच्या अंगावर काटे येतात. या पेक्षा बाहेरच खाऊन घेऊ या, हा विचार असतोच.पण काही महिलांना जेवण बनवण्याचं आणि आपल्या हाताचं जेवण खाऊ घालण्याचं एक वेड असतं. अशा व्यक्ती फार कमी असतात. रुचकर जेवण आणि तेही तासंनतास न थकता अशाच व्यक्तींना बनवता येतं. अशाच एका महिलेने सलग १०० तास जेवण बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. १०० तास सलग स्वयंपाक बनवण्याचा हा विश्वविक्रम पहिल्यांदाच झाला आहे. या आधी हा रेकॉर्ड भारतीय महिलेच्या नावावर होता.पण हा रेकॉर्ड एका महिला शेफनेच कसा मोडीत काढला आहे पाहा.

लागोस शहरातील मेगासिटीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. शेफ हिल्डा बासी हिने सतत १०० तास स्वयंपाक करण्याचा रेकॉर्ड केला आहे. हे एक मॅराथॉन कुकिंग होतं,सोमवारी रात्री संपलेल्या या चित्तथरारक रेकॉर्डची सर्वत्र चर्चा आहे. बासी ही २७ वर्षांची आहे. बासी या शेफने बीनच्या पिठापासून बनवलेल्या जोलोफ तांदळापासून पास्ता तसेच ११ प्रकारचे स्थानिक व्यंजन बनवले, यानंतर परदेशी मिश्रणाचे पदार्थ ती कसे बनवत आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक तासांपासून तळ ठोकून होते. . रेकॉर्ड पूर्ण झाल्यानंतर बासी हिने जोरदार आनंद व्यक्त केला आहे, बासी मागील ५ दिवसांपासून सलग स्वयंपाक बनवत आहे. अध्यक्ष मुहम्मदु बुहारी आणि अनेक राजकारणी आणि ख्यातनाम व्यक्तींनी बासी यांचे अभिनंदन केले आणि समर्थकांनी आनंद व्यक्त केला. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकार्‍यांनी अधिकृत बनवण्‍यापूर्वी बासीचा वेळ प्रमाणित करणे आवश्‍यक असल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतासारख्या देशात या रेकॉर्डचं विशेष आकर्षण असणार आहे. कारण तुलनेने भारतात खाद्य संस्कृती अधिक बहरेलेली आणि विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती भारतात आहेत. यापूर्वी भारतीय शेफ लता टंडन यांनी सलग नव्वद तास जेवण बनविण्याचा रेकॉर्ड केला होता.  यापुढील बासीचा रेकॉर्ड एखादी भारतीय व्यक्तीच मोडीत काढेल हे नक्की, पण हिल्डा बासीचा हा रेकॉर्ड देखील कौतुकास्पद आहे. जगाच्या तुलनेत भारतात आजही रेसिपी फार मोठ्या प्रमाणात वाचल्या जातात आणि त्याप्रमाणे खाद्य पदार्थ बनवून पाहिले जातात.

Nigerian chef Hilda Baci break indian chef Lata Tandon record

Nigerian chef Hilda Baci break indian chef Lata Tandon record

हिल्डा बासी हिचा या वर्ल्ड रेकॉर्ड निश्चित महिलांसाठी प्रेरणादायक आहे, तिने नायजेरियातील महिलांचा सन्मान आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा सतत १०० तास स्वयंपाक बनवण्याचा रेकॉर्ड बनवला असल्याचं तिने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. हिल्डा बासी मागील १०० तासांपासून उभी राहून स्वयंपाक बनवत होती, जेव्हा तिचा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण झाला तेव्हा ती आनंदाने नाचत होती, तिच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाची लहर दिसून आली, अनेकांनी तिच्या या रेकॉर्डवर आनंद व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.