AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Masala Khichdi :’या’ सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि हेल्दी मसाला खिचडी तयार करा, पाहा रेसिपी!

जर तुम्हाला काही झटपट आणि चविष्ट बनवायचे असेल तर तुम्ही मसाला खिचडी देखील बनवू शकता. ही मसाला खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ, मूग डाळ, बटाटा, गाजर आणि गरम मसाला पावडर इत्यादी साहित्य लागेल. हे केवळ तुमची भूक शमवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Masala Khichdi :'या' सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि हेल्दी मसाला खिचडी तयार करा, पाहा रेसिपी!
मसाला खिचडी
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 12:12 PM
Share

मुंबई : जर तुम्हाला काही झटपट आणि चविष्ट बनवायचे असेल तर तुम्ही मसाला खिचडी देखील बनवू शकता. ही मसाला खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ, मूग डाळ, बटाटा, गाजर आणि गरम मसाला पावडर इत्यादी साहित्य लागेल. हे केवळ तुमची भूक शमवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पोषक तत्वांनी युक्त ही डिश विविध प्रकारे तयार करता येते. (Special recipe for making Masala Khichdi)

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तांदळाऐवजी साबुदाणा देखील वापरू शकता. ही रेसिपी आणखी चवदार बनवण्यासाठी तुम्ही तूप, मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्त्यापासून बनवलेले टेम्परिंग घालू शकता. पापड बरोबर सर्व्ह केल्यावर त्याची चव चांगली लागते. थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून सजवा. स्वादिष्ट मसाला खिचडी तयार करण्यासाठी साहित्य

-तांदूळ – 1 कप

-चिरलेला कांदा – 2 कप

-उकडलेले गाजर – 1/2 कप

-तिखट – 1/2 टीस्पून

-गरम मसाला पावडर – 1/2 टीस्पून

-तूप – 2 टीस्पून

-पिवळी मूग डाळ – 1 कप

-कापलेले बटाटे – 2

-शिजवलेले शिमला मिर्च – 1/2 कप

-मोहरी – 1 टीस्पून

-तेल – 1 टीस्पून

-आवश्यकतेनुसार मीठ

स्टेप – 1

डाळ आणि तांदूळ धुवून घ्या. त्यांना 15 मिनिटे पाण्यात भिजवा. एक चॉपिंग बोर्ड घ्या आणि कांदा, हिरवी मिरची, गाजर, बटाटा बारीक करू घ्या. प्रेशर कुकरमध्ये बारीक आले, 1 टीस्पून तूप आणि 1 टीस्पून तेलाने कांदा तळून घ्या.

स्टेप – 2

कांदा हलका तपकिरी झाल्यावर मोहरी आणि हिरव्या मिरच्या घाला. आता लाल तिखट आणि गरम मसाला घाला. ही रेसिपी अधिक स्वादिष्ट करण्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यात गरम मसाला घालू शकता. यामुळे डिश आणखी सुगंधी बनते. थोडावेळ तळून घ्या, तांदूळ आणि डाळ घालून दोन्ही 3-4 मिनिटे तसेच राहूद्या. आता यामध्ये सर्व भाज्या मिक्स करा.

स्टेप – 3

यामध्ये आता 2 ग्लास गरम पाणी घाला. बटाट्याचे तुकडे आणि मीठ घाला. जेव्हा पाणी उकळू लागते, तेव्हा कुकरला झाकण लावा आणि 3 शिट्या होऊद्या. सर्व्ह करण्यापूर्वी वर तूप शिंपडा. आपण आपले स्वतःचे टेम्परिंग देखील बनवू शकता, जे या सोप्या रेसिपीचा स्वाद आणि सुगंध वाढवेल. या खिचडीसोबत मस्त गरमा-गरम पापड देखील समाविष्ट करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special recipe for making Masala Khichdi)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.