Immunity Booster : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची ‘हे’ जाणून घ्या!

हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येकाच्या पौष्टिक गरजा ऋतूनुसार बदलतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या शरीराला योग्य पोषण देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ऋतू बदलाबरोबर शरीरात अनेक आजार उद्भवतात.

Immunity Booster : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची 'हे' जाणून घ्या!
आरोग्य


मुंबई : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येकाच्या पौष्टिक गरजा ऋतूनुसार बदलतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या शरीराला योग्य पोषण देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ऋतू बदलाबरोबर शरीरात अनेक आजार उद्भवतात. या काळात ताप, सर्दी, खोकला यासारख्या समस्या कायम राहतात.

1. कोणताही शारीरिक आजार रोखण्यासाठी मुख्य आणि महत्त्वाची बाब म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे. जर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती जास्त असेल तर तुम्ही या सर्व शारीरिक आजारांना जसे ताप, खोकला, सर्दी या आजारांना सहज बळी पडणार नाही. मात्र, सप्लिमेंट्स न घेता नैसर्गिक पौष्टिक फळे खाऊन शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे.

2. निरोगी राहण्यासाठी या ऋतूत मिळणारी फळे अधिक प्रमाणात खा. कोणतेही नैसर्गिक पोषणयुक्त फळ शरीरावर चांगले कार्य करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हंगामी फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. याशिवाय रोगप्रतिकारक कशक्ती वाढवण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही मोसंबी, लिंबू, किवी, पपई आणि पेरू यांसारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता.

3. भारतीय मसाले आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. यापैकी केशर, हळद, दालचिनी आणि वेलची यांसारखे भारतीय मसाले हिवाळ्यात खूप उपयुक्त आहेत. कारण हे मसाले शरीराला आवश्यक उष्णता देतात. ते सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या सामान्य आजारांपासून बचाव करण्यास देखील मदत करतात. हे मसाले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. गरम पेयांमध्ये हे मसाले घालून तुम्ही ते पिऊ शकता.

4. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. पालक हे जीवनसत्त्वे अ आणि क चा चांगला स्रोत आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे घटक अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगले आहेत. तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यातील हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI