Bed Tea Side Effects : तुम्हालाही बेड टी घेण्याची सवय आहे? मग, ही खास बातमी तुमच्यासाठी!

आपल्यापैकी अनेकांना दिवसातून अनेक वेळा चहा घेण्याची सवय असते. जोपर्यंत सकाळचा चहा मिळत नाही. तोपर्यंत त्यांच्या दिवसाची सुरूवात देखील होत नाही.

Bed Tea Side Effects : तुम्हालाही बेड टी घेण्याची सवय आहे? मग, ही खास बातमी तुमच्यासाठी!
कोमट पाण्यात मध मिक्स करू प्या
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:14 AM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना दिवसातून अनेक वेळा चहा घेण्याची सवय असते. जोपर्यंत सकाळचा चहा मिळत नाही. तोपर्यंत त्यांच्या दिवसाची सुरूवात देखील होत नाही. चहा त्यांचा आळस दूर करतो कारण चहामध्ये असलेले कॅफिन शरीर सक्रिय करते. परंतु काही लोकांची सकाळ चहाशिवाय नसते. सकाळी उठल्याबरोबर काही लोकांना बेड टी घेण्याची सवय असते. मात्र, बेड टीची सवय लागल्यामुळे स्नायू आणि डोकेदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. (Taking bed tea is harmful to health)

1. अल्सरची समस्या : सकाळी रिकाम्या पोटी गरम चहा पिण्यामुळे पोटाच्या आतील पृष्ठभागावर हानी होते. तसेच, रिकाम्या पोटी चहा देखील आम्ल तयार करते. अशा परिस्थितीत हळूहळू पोटात अल्सरची समस्या उद्भवते. यासाठी बेट टी घेणे टाळाच.

2. वजन वाढवणे : जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर तुम्ही कधीही सकाळी बेड टी पिऊ नये. सकाळी चहाबरोबरच साखर देखील तुमच्या रिकाम्या पोटात पोचते, ज्यामुळे तुमचे वजन खूप वेगाने वाढण्यास सुरूवात होते.

3. सांधेदुखीची समस्या: जास्त चहा प्यायल्याने सांधेदुखी देखील होते. अशा परिस्थितीत, जे लोक सकाळी बेड टी घेतात, त्याचे दुष्परिणाम अधिक वेगाने वाढतात आणि कमी वयातच सांधे दुखीची तक्रार सुरू होते.

4.पाचन तंत्राचा त्रास : बेड टी आपल्या पाचन तंत्राला त्रास देते. जे लोक सकाळी चहा  रिकाम्या पोटी पितात, गॅस, अपचन, आंबटपणा, पोटात जळजळ यासारख्या समस्या बहुधा दिसतात.

5. तणाव वाढतो : जे लोक चहा भरपूर पितात, अशा व्यक्तींच्या शरीरात कॅफिनचे प्रमाण लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत जर बेड टी घेण्याची सवय असेल तर राग, चिडचिडेपणा आणि तणाव वाढण्याची शक्यता जास्त असते.

6.बीपीचा त्रास होतो : सकाळचा चहा तुमच्या शरीरावर फार लवकर परिणाम करतो. अशा परिस्थितीत, शरीरात कॅफिन खूप वेगाने विरघळते ज्यामुळे हृदयाचा धोका निर्माण होतो. म्हणूनच बेड टी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली नाही.

7.काय करायचं – बेड टीऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लिंबू चहा घ्या. ग्रीन टी आणि लिंबू चहामध्ये साखरेऐवजी मध वापरा. पण त्याआधी नक्कीच एक ग्लास पाणी प्या. चहाचे व्यसन जास्त असल्यास, पाणी पिल्यानंतर, दोन बिस्किटे किंवा चहासह टोस्ट घ्या. रिक्त पोटी चहा कधीही घेऊ नका.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Taking bed tea is harmful to health)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.