मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ फळ असते फायदेशीर, फायदे काय?

साधारणपणे गोड फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य मानली जात नाही. परंतु सिताफळामध्ये असे काही गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'हे' फळ असते फायदेशीर, फायदे काय?
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 9:28 AM

Custard Apple Benefits : सिताफळाला कस्टर्ड ॲपल म्हणून देखील ओळखले जाते. हे एक पौष्टिकतेने समृद्ध असे फळ आहे. सिताफळ हे चवीसाठी उत्तम असून आरोग्यासाठीही गुणकारी असते. साधारणपणे गोड फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य मानली जात नाही. परंतु सिताफळामध्ये असे काही गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरते.

 मधुमेहाच्या रुग्णांसाठी सीताफळ कसे फायदेशीर?

वजन नियंत्रित ठेवते : मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. कारण जास्त वजन वाढल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. सीताफळामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. कॅलरी आतड्यांमध्ये झपाट्याने शोषल्या जातात आणि त्यामुळे दीर्घकाळपर्यंत पोट भरलेले वाटते. जास्त खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

फायबर : सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचन हळू करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायबरचे सेवन महत्त्वाचे आहे. कारण फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. फायबर हळूहळू साखर शोषून घेण्याची प्रक्रिया नियंत्रित करतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध निर्माण होतो.

कोलेस्ट्रॉल कमी : सीताफळात आढळणारे हेल्दी फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो. सीताफळ खाल्ल्याने या समस्या कमी होऊ शकतात.

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध : सीताफळ मध्ये व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत असतो जो एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. अँटिऑक्सिडंट शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सामान्यतः जास्त असतात.

मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्त्रोत : सीताफळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात.जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मधुमेहाच्या रुग्णांना हृदयाच्या समस्यांचा धोका जास्त असतो आणि या खनिजांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी धोका कमी होतो.

सीताफळाचे सेवन कसे करावे?

ताज्या आणि पूर्ण पिकलेले सीताफळ खा जास्त पिकलेले सीताफळ गोड असते आणि त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते म्हणून ते मर्यादित प्रमाणात खा.

सीताफळ आरोग्यदायी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो किंवा त्याचा ज्यूस करूनही पिता येतो.

गोड फळे किंवा गोड पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य मानली जात नाही आणि त्यांना ती न खाण्याचा अनेकदा सल्ला दिला जातो.

परंतु सीताफळामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.