बाळ पेन्सिल व्यवस्थित पकडू शकत नाही? ‘हे’ छोटेसे काम करा
तुमचे बाळ पेन्सिल योग्य पकडू शकत नसेल आणि अक्षर खराब येत असेल, तर काळजी करू नका. या सोप्या उपायांनी तुमच्या मुलाच्या बोटांची पकड मजबूत होईल, ज्यामुळे त्याच्या हस्ताक्षरात वेगाने सुधारणा दिसेल आणि तो आत्मविश्वासाने लिहील.

अनेक पालकांना ही समस्या भेडसावते की, त्यांचे बाळ पेन्सिल योग्य प्रकारे पकडू शकत नाही, ज्यामुळे त्याचे अक्षर चांगले येत नाही. ही चिंतेची बाब असली तरी, त्यावर उपाय आहेत! पेन्सिलची योग्य पकड (Grip) आणि सुंदर अक्षर यासाठी तुम्ही काही तज्ज्ञांनी सुचवलेले सोपे आणि प्रभावी उपाय वापरून पाहू शकता. हे उपाय केवळ तुमच्या मुलाच्या बोटांची पकड मजबूत करणार नाहीत, तर त्याची लिखावटही अधिक सुंदर बनवतील.
पेन्सिल पकडण्यासाठी खास ‘क्ले’ ट्रिक:
पेन्सिल पकडण्याची पकड सुधारण्यासाठी, ‘क्ले’चा बॉलच्या आकाराचा एक छोटासा गोळा बनवा आणि तो पेन्सिलच्या मागच्या टोकाला (इरेझरच्या बाजूने) जोडून द्या. यामुळे पेन्सिलला ‘लॉली-पॉप’सारखा आकार येईल आणि ती थोडी जड होईल. ही पेन्सिल मुलाला लिहायला दिल्यास, त्याला ती अधिक घट्ट पकडावी लागते. या सोप्या ‘पेन्सिल ॲक्टिव्हिटी’मुळे मुलाच्या बोटांचे स्नायू मजबूत होतात आणि त्याच्या हस्ताक्षरात वेगाने सुधारणा दिसू लागते.
इतर सोपे आणि प्रभावी उपक्रम:
फक्त ‘क्ले’ ट्रिकच नाही, तर इतरही काही उपक्रम आहेत जे मुलांच्या बोटांची पकड सुधारण्यास मदत करतात:
1. लहान वस्तू उचलणे: मुलांना लहान मोती, तांदळाचे दाणे, गोट्या (कंचे) किंवा मणी यांसारख्या लहान गोष्टी बोटांनी उचलण्यास सांगा. असे केल्याने बोटांची पकड मजबूत होते आणि त्यांना सूक्ष्म हालचालींवर नियंत्रण मिळवता येते.
2. पेंसिल ग्रिपरचा वापर: बाजारात पेन्सिल पकडण्यासाठी खास ‘ग्रिपर’ (Gripper) मिळतात. हे ग्रिपर मुलांना पेन्सिल योग्य पद्धतीने पकडण्यास मदत करतात आणि त्यामुळे बोटांवर योग्य दाब येतो.
3. ड्रॉइंग आणि रंग भरणे: मुलांना ड्रॉइंग करण्यास किंवा चित्रांमध्ये रंग भरण्यास प्रोत्साहन द्या. ड्रॉइंग करताना आणि रंग भरताना बोटांचा वापर होतो, ज्यामुळे बोटांची पकड मजबूत होते आणि पेन्सिलवर योग्य नियंत्रण मिळवता येते. हे मुलांसाठी एक मजेशीर उपक्रमही ठरतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
