AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किचनमधील फर्निचरला लागतेय धूळ, येतेय दुर्गंधी… ‘हा’ एक सोपा आणि स्वस्त पर्याय… आजच करुन बघा वापर

फर्निचरची वेळेवर साफसफाई न केल्यास, दुर्गंधी, बुरशी आणि फर्निचरचं नुकसान यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. किचनमधील फर्निचर जास्त खराब होतं. त्यामुळे जाणून घ्या कमी पैशांमध्ये फर्निचर स्वच्छ ठेवता येईल... आजच करुन बघा वापर

किचनमधील फर्निचरला लागतेय धूळ, येतेय दुर्गंधी... 'हा' एक सोपा आणि स्वस्त पर्याय... आजच करुन बघा वापर
| Updated on: Jun 14, 2026 | 2:39 PM
Share

नवीन असेल तेव्हा फर्निचर फार चांगलं दिसतं. पण त्याचा वापर सुरु केल्यानंतर अनेक समस्या समोर येतात. फर्निचरला सतत धूळ लागले, जी साफ करणं देखील कठीण होतं. कारण सतत फर्निचर साफ करणं शक्य नसतं…  अशात किचनमधील फर्निचन साफ करणं सर्वात कठीण असतं. सांगायचं झालं तर, किचनमधील ड्रॉवर हे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या आणि सर्वात घाणेरड्या वस्तूंपैकी एक आहेत. विशेषतः लाकडी ड्रॉवरमध्ये अन्नाचे कण, तेलाचे डाग, ओलावा आणि धूळ सहजपणे जमा होतात.

वेळेवर साफसफाई न केल्यास, दुर्गंधी, बुरशी आणि फर्निचरचं नुकसान यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. या समस्येवर एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय म्हणून ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. अनेक लोक किचनमधील ड्रॉवर स्वच्छ करण्यासाठी त्यात ॲल्युमिनियम फॉइल गुंडाळून ठेवतात.

ड्रॉवरला ॲल्युमिनियम फॉइल लावण्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या 

ॲल्युमिनियम फॉइल एका संरक्षक थराप्रमाणे काम करतं. फर्निचरला ॲल्युमिनियम फॉईल लावल्यामुळे घाण थेट लाकडी पृष्ठभागाला चिकटत नाही आणि स्वच्छता करणं सोपं होतं. त्याचप्रमाणे, ते लाकडात ओलावा शिरण्यापासून रोखते, ज्यामुळे फर्निचर फुगण्याची किंवा त्याला बुरशी लागण्याची शक्यता कमी होते. हे विशेषतः किचनमध्ये उपयुक्त ठरू शकतं, जिथे सतत ओलावा आणि तेलाचा संपर्क येतो.

ॲल्युमिनियम फॉइल कशी लावावी? सर्वप्रथम, ड्रॉवर पूर्णपणे रिकामा करा. आतील धूळ आणि घाण स्वच्छ करा आणि ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. त्यानंतर ड्रॉवरच्या आकारानुसार ॲल्युमिनियम फॉइल कापा. फॉइलची चकचकीत बाजू वर करून ती ड्रॉवरमध्ये ठेवा. ती सपाट करण्यासाठी हळूवारपणे दाबा, जेणेकरून हवेचे बुडबुडे राहणार नाहीत. त्यानंतर, ड्रॉवरमध्ये आवश्यक वस्तूंची पुन्हा मांडणी करता येईल.

ते किती वेळा बदलावे?  ड्रॉवरच्या वापराप्रमाणे आणि घाणीनुसार फॉइल बदलली पाहिजे. साधारणपणे महिन्यातून एकदा नवीन फॉइल लावण्याचा सल्ला दिला जातो. ही छोटी आणि सोपी युक्ती किचनमधील ड्रॉवर दीर्घकाळ स्वच्छ, दुर्गंधीमुक्त आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा