‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या संचालिका नताशा पूनावालाही सोशल मीडियावर चर्चेत, वाचा त्यांच्याविषयी…

‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या संचालिका नताशा पूनावालाही सोशल मीडियावर चर्चेत, वाचा त्यांच्याविषयी...

नताशा या अदर पूनावाला यांच्या पत्नी असून, त्या सीरम कंपनीच्या संचालिक आहेत. जगातील बड्या देशांशी लसीचा करार फायनल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Harshada Bhirvandekar

|

Jan 21, 2021 | 7:26 PM

मुंबई : भारतात मंजुरी मिळालेल्या दोन कोरोना लसींपैकी एक ‘कोव्हिशिल्ड‘ ही लस जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने तयार केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर कंपनीने ही लस विकसित केली आहे. जगाला या साथीच्या आजारापासून वाचवण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ही लस मोठी भूमिका बजावत आहे (Know About Adar Poonawalla’s Wife and executive director of serum institute Natasha Poonawalla).

या लसीमुळे ‘सीरम’ कंपनीचे मालक अदर पूनावालांबद्दल सगळ्यानांच माहित झाले आहे. ते या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच मुख्य कार्यकारी संचालक आहेत. परंतु, जितक्या लोकांना अदर यांच्याबद्दल माहिती आहे, अशा लोकांपैकी अर्ध्या लोकांनासुद्धा कदाचित त्यांची पत्नी नताशा पूनावाला यांच्याबद्दल माहिती नसेल. नताशा या अदर पूनावाला यांच्या पत्नी असून, त्या सीरम कंपनीच्या संचालिक आहेत. जगातील बड्या देशांशी लसीचा करार फायनल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बॉलिवूड सेलिब्रिटीं इतकी लोकप्रियता

नताशा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर त्याचे 5.63 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांची नवनवीन छायाचित्रे इंस्टावर बर्‍याचदा पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये त्या बॉलिवूड स्टार्ससोबत दिसतात. नताशा स्वत: बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत, पण तिची लोकप्रियताही एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. नताशा पूनावाला यांचे नाव भारताच्या नामांकित व्यक्तींमध्ये समाविष्ट आहे.

नताशा पूनावाला, पती अदर यांच्यासह पुण्यात राहतात, पण त्यांचा मुंबईत देखील बंगला आहे. मलायका अरोरा, सोनम कपूर, करण जोहर, करिश्मा, करीना आणि बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सबरोबर नताशा बर्‍याचदा एकत्र दिसतात.

(Know About Adar Poonawalla’s Wife and executive director of serum institute Natasha Poonawalla)

मलायका, करण जोहर, करीना कपूर खान, मनीष मल्होत्रा ​​यांच्यासह अनेक बडे सेलेब्रिटी नताशा यांचे चांगले मित्र आहेत. त्या स्वतः मनोरंजन क्षेत्रात कार्यरत नसल्या, तरी त्यांचे बॉलिवूडशी जवळचे संबंध आहेत. इतकेच नव्हे तर, नताशा त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील चर्चेत असतात. बर्‍याच प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजवरही त्या झळकल्या आहेत (Know About Adar Poonawalla’s Wife and executive director of serum institute Natasha Poonawalla).

अशी झाली होती अदर आणि नताशा यांची पहिली भेट…

नताशा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तर, अदार पूनावाला यांनीही लंडनमधील ‘वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून’ अभ्यास पूर्ण केला आहे. इथेच त्या दोघांची भेट झाली होती. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार बिझनेस टायकून विजय मल्ल्या यांच्या एका पार्टीत या दोघांची पहिली भेट झाली. नंतर दोघांनी एकमेकांना डेट केले आणि एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेतला.

2006मध्ये दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या संमतीने लग्नगाठ बांधली. या दोघांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला होता. ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, बिझनेस टायकून विजय मल्ल्या आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अदर पूनावाला आणि नताशा यांना दोन मुले देखील आहेत.

(Know About Adar Poonawala’s Wife and executive director of serum institute Natasha Poonawalla)

हेही वाचा :

Serum Institute Fire Live | पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

Serum Institute Fire : सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग, मात्र कोव्हिशील्ड लस सुरक्षित

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें