Serum Institute Fire | कोरोना लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग, ‘कोव्हिशिल्ड’ सुरक्षित!

पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:24 PM, 21 Jan 2021
1/6
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
2/6
Serum Fire
पुण्यातील मांजरा परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीत ही घटना घडली आहे.
3/6
अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
4/6
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
5/6
मात्र, कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
6/6
आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.