Himalayan Pink Salt | हिमालयीन मीठाचा कसा वापर करावा? जाणून घ्या याचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे…
हिमालयीन पिंक सॉल्ट हा एक प्रकारचा खडे मीठाचा प्रकार आहे, जो पाकिस्तानच्या पंजाब भागातील हिमालयाच्या पायथ्याजवळ आढळतो. हे मीठ बर्याच वेळा शुद्ध मीठ मानले जाते, कारण ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.

मुंबई : आपण आपल्या नेहमीच्या अन्नामध्ये समुद्री मीठ वापरतो, जे बऱ्याचदा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होते. परंतु, पूर्ण माहिती नसल्यामुळे लोक त्याचे भरपूर सेवन करतात. मात्र, जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर यासाठी तुम्ही हिमालयीन मीठ आहारात वापरू शकता (Know About Himalayan Pink Salt benefits).
हिमालयीन पिंक सॉल्ट हा एक प्रकारचा खडे मीठाचा प्रकार आहे, जो पाकिस्तानच्या पंजाब भागातील हिमालयाच्या पायथ्याजवळ आढळतो. हे मीठ बर्याच वेळा शुद्ध मीठ मानले जाते, कारण ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. रासायनिक प्रकारानुसार हे साधारण मीठासारखेच आहे, ज्यामध्ये 98 टक्के सोडियम क्लोराईड आहे.
यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे खनिज घटक देखील असतात. हे मीठ कोणत्याही प्रकारे आपलल्या नुकसान करत नाही. परंतु, आपल्याला या मीठाबद्दल माहित असणे आवश्यक आहे. चला तर, या मीठाबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
कसे वापरावे हे मीठ?
हिमालयीन गुलाबी मीठ सामान्य मीठाप्रमाणे जेवणात किंवा एखादा पदार्थ सिझनिंग करण्यासाठी वापरले जाऊ शकतो. लोक हे मीठ अंघोळीसाठी देखील वापरतात किंवा या मीठापासून बनवलेला दिवा किंवा मेणबत्ती घरात लावतात.
या मीठाचे महत्त्व?
– आपल्या शरीरावर हे मीठ आवश्यक आहे:
– स्नायूंना संकुचित करून आराम मिळतो.
– डिहायड्रेशन प्रतिबंधित करते आणि द्रव संतुलन राखते.
– कमी रक्तदाब प्रतिबंधित करते.
(Know About Himalayan Pink Salt benefits)
हिमालयीन मीठाचे फायदे आणि मान्यता
– असे मानले जाते आहे की, गुलाबी हिमालयन मीठात सामान्य मीठापेक्षा कमी सोडियम असते. परंतु, हे खरे नाही. त्यामध्ये 98 टक्के सोडियम क्लोराईड असते, याचाच अर्थ त्यामध्ये समान प्रमाणात सोडियम असते.
– हे मीठ अधिक नैसर्गिक मानले जातात. क्लेम्पिंग टाळण्यासाठी नेहमीचे मीठ अधिक रिफाईंड केले जाते. त्यात अनेक घटक मिसळले जातात. परंतु, हिमालयीन मीठ रिफाईंड केले जात नाही आणि त्यात कोणतेही घटक मिसळले जात नाहीत.
– हिमालयीन मीठ आपल्या शरीरात द्रव संतुलन राखण्यासाठी आणि निर्जलीकरण रोखण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे म्हणणे योग्य आहे, कारण द्रव संतुलन राखण्यासाठी आपल्याला शरीराला सोडियम आवश्यक आहे.
हे लक्षात ठेवा!
थायरॉईड फंक्शन्स आणि सेल मेटाबोलिझमसाठी आयोडीन महत्वाचे आहे. गुलाबी हिमालयीन मीठात आयोडीनयुक्त मीठापेक्षा कमी आयोडीन असते. याचमुळे आयोडीनची कमतरता असलेल्या लोकांना, या गुलाबी मीठाबरोबर आयोडीनयुक्त मीठ देखील खाल्ले पाहिजे.
(Know About Himalayan Pink Salt benefits)
हेही वाचा :
आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?
Hair Care Tips | मजबूत आणि घनदाट केस हवेत, तर आजच ‘हा’ उपाय ट्राय करा!
जेवणात ‘या’ गोष्टी एकत्र खाताय? सावधान! आरोग्याला होऊ शकते हानी https://t.co/qgBXY6UabO | #DietFood | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2021
