आरोग्यासाठी बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, जाणून घ्या याचे फायदे…

शितल मुंडे, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Mar 13, 2021 | 11:23 AM

कच्ची हळद अर्थात ओली हळद औषधी गुणांचा खजिना आहे. हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

आरोग्यासाठी बहुगुणकारी 'कच्ची हळद', जाणून घ्या याचे फायदे...
Follow us

मुंबई : कच्ची हळद अर्थात ओली हळद औषधी गुणांचा खजिना आहे. हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. साधारणतः हिवाळ्यामध्येच ओली हळद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. आयुर्वेदात कच्ची हळद सूज कमी करण्यास, सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध लढण्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. (know the amazing benefits of raw turmeric)

-कच्च्या हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते

-कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो.

-मुक्कामार किंवा सूज आल्यावर कच्ची हळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.

-शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर कच्ची हळदचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

-साकलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यासाठी कच्ची हळद उगाळून कोमट करुन ती रक्त साकळलेल्या जागेवर लावावी.

-शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर कच्ची हळदचा लेप लावावा.

-कच्ची हळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो

-कच्ची हळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.

संबंधित बातम्या : 

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

(know the amazing benefits of raw turmeric)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI