शिळा भात खाणे टाळताय? मग ‘हे’ वाचा !

रात्री उरलेला शिळा भात आपण शक्यतो फेकून देतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, शिळा भात खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

शिळा भात खाणे टाळताय? मग 'हे' वाचा !
भात

मुंबई : रात्री उरलेला शिळा भात आपण शक्यतो फेकून देतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, शिळा भात खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रात्री उरलेल्या भातामध्ये आरोग्याचा खजिना आहे हे थोडे वेगळे वाटेल पण खरतर उरलेला शिळा भात फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शिळा भात खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे होतात. चला तर मग पाहूयात शिळा भात खाण्याचे फायदे (know the benefits of eating leftover rice)

-शिळा भात खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते कारण शिळा भात देखील उर्जेचा स्त्रोत मानला गेला जातो. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक उर्जा मिळते आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहताल.

-शिळ्या भाताचे सेवन केलेतर अल्सरचा घाव लवकर बरा होतो कारण यामध्ये अल्सरचा घाव ठीक करण्याचे बरेच गुण आहेत.जर अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीन वेळा शिळा भात सेवन केले पाहिजे. यामुळे अल्सरचा घाव लवकर ठीक होईल.

-सकाळच्या वेळी शिळ्या भाताचे सेवन करण्याने बद्धकोष्ठची समस्या होत नाही जर दररोज शिळ्या भाताचे सेवन केले तर बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. कारण भाता मध्ये फाइबर जास्त असतात.

-दररोज सकाळी शिळा भात खाल्ल्याने तुमची चहाची सवय देखील सुटू शकते.

– शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

– शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रीत राहते.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(know the benefits of eating leftover rice)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI