Health Tips : देशी इलाज, आजार खल्लास; माठातील गारगार पाणी प्या, ‘या’ आजारांना दूर पळवा!

बहुतेक लोक उन्हाळ्याच्या काळात थंड पाणी पितात. मात्र, बहुतेक लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी फ्रीजचे पाणी पिण्यास सुरुवात करतात.

Health Tips : देशी इलाज, आजार खल्लास; माठातील गारगार पाणी प्या, 'या' आजारांना दूर पळवा!
माठातील पाणी

मुंबई : बहुतेक लोक उन्हाळ्याच्या काळात थंड पाणी पितात. मात्र, लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी फ्रीजचे पाणी पिण्यास सुरुवात करतात. परंतु आपणास माहित आहे की फ्रीजचे पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते. एवढेच नव्हे तर आरोग्य तज्ज्ञ देखील उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिणे धोकादायक असल्याचे म्हणतात. (know the health benefits of drinking water in earthen pot)

फ्रीजमधील पाणी पिण्यामुळे सर्दी, ताप, खोकला आणि घश्यातील त्रास होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत उष्णता टाळण्यासाठी आपण मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या माठातील पाणी पिऊ शकतो. माठातील पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

चयापचय वाढवते
प्लास्टिकच्या भांड्यात पाणी साठवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. प्लास्टिकमध्ये बीपीएसारखे हानिकारक रसायने असतात जे अंतःस्रावासाठी हानिकारक असतात. परंतु माठ तयार करण्यासाठी कोणतेही रसायने वापरली जात नाहीत. माठातील पाणी पिल्यामुळे पाचन तंत्र सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त हे अनेक गंभीर आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते.

घश्यासाठी फायदेशीर
उष्णतेशी संबंधित आजारांमध्ये स्वत: चे रक्षण करण्यासाठी फ्रीजच्या पाण्यापेक्षा आपण माठातील पाणी पिले पाहिजे. फ्रीजमधील पाणी पिल्याने घश्याच्या पेशींचे नुकसान होते. मात्र, माठातील पाणी पिल्यामुळे कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. माठातील पाणी पिल्यामुळे आपला घश्याला कोणत्याही त्रास होत नाही.

त्वचेसाठी चांगले
जर रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी आपण माठातील पाणी पिले तर शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते.

अॅसिडिटीसाठी फायदेशीर
माठातील पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील पीएच संतुलित राहण्यास मदत होते. ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीशी संबंधित समस्या दूर होतात.

उष्माघात रोखते
माठामध्ये पाणी ठेवा, भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीरात ग्लूकोजची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे आपले शरीर थंड होते. उन्हाळ्यात उष्माघात आणि निर्जलीकरण समस्या रोखण्यासाठी माठातील पाणी प्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
माठातील पाणी पिल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.  दररोज सकाळी झोपीतून उठल्यानंतर एक ग्लास माठातील पाणी पिले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(know the health benefits of drinking water in earthen pot)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI