AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचा चमकदार बनण्याबरोबर वजनही कमी होते; जाणून घ्या पाणी पिण्याचे 5 फायदे

पाणी पिण्यामुळे माणसाचा उन्हातान्हात फिरल्यानंतरचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठीही पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. (Know the water benefits, beneficial for skin and weight loss)

त्वचा चमकदार बनण्याबरोबर वजनही कमी होते; जाणून घ्या पाणी पिण्याचे 5 फायदे
पाणी पिणे फायदेशीर
| Edited By: | Updated on: May 11, 2021 | 7:43 AM
Share

मुंबई : उकाडा प्रचंड वाढला आहे, अंगाची लाहीलाही होतेय म्हणून केवळ तहान भागवण्यापुरता पाणी पिऊ नका. दिवसभरात तुम्ही जेवढे अधिकाधिक पाणी प्याल, तितके ते पाणी तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्तच असेल. ज्यादा पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. पाणी पिण्यामुळे माणसाचा उन्हातान्हात फिरल्यानंतरचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठीही पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. जे लोक नियमित पुरेशा प्रमाणात पाणी पितात, त्यांची त्वचा चमकदार असते. म्हणजेच काय तर नियमित पाणी पिण्यामुळे त्वचा अधिक चमकदार बनते तसेच आपले वजनही नियंत्रणात ठेवते. आपल्याला स्थूलपणा येत नाही. (Know the water benefits, beneficial for skin and weight loss)

मनुष्याच्या शरिरात 60 टक्के पाणी असते. एका व्यक्तीने स्वत:चे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अर्थात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे. हे केवळ आपल्या शरिराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक नसते, तर वजन कमी करण्यासाठी सहाय्यक ठरते. पाणी मनुष्य जीवनासाठी अत्यंत गरजेचे आहे. परंतु, आपल्यापैकी खूप कमी लोक पुरेशा प्रमाणात पाणी पितात. कमी पाणी पिणे आपल्या आरोग्याला नुकसान पोहोचवते. पाणी ‘सिक्रेट इनग्रेडिएंट’ रुपात सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. पाण्याचे पाच फायदे आहेत, जे आपल्यापैकी अनेकांना ठाऊकही नसतील.

आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवते

कमी पाणी पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो. नेमके त्याच्या उलट म्हणजे अधिक पाणी पिण्यामुळे आपल्या शरिरात पुरेशी ऊर्जा मिळते. जर आपले शरिर पुरेसे हायड्रेटेड नसेल तर यामुळे कोणत्याही शारिरीक व्याधीला निमंत्रण मिळू शकते. पाणी आपल्या शरिराचे तापमान नियंत्रणात ठेवते, त्याचबरोबर शरीर थंड आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टीने नियंत्रणात ठेवते.

डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास थांबवते

डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे डिहायड्रेशन. आपल्या शरिरातील मस्तिष्काची कार्ये सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तसेच पचनक्रिया ठीक ठेवण्यासाठी पोटात पुरेशा प्रमाणात लिक्विडची गरज असते. पाणी पिण्यामुळे आपल्या डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दिलासा मिळू शकतो.

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

पाणी आपल्या मेटाबॉलिज्मचा रेट वाढवण्यास मदत करते. याचा अर्थ आपले शरिर अ‍ॅक्टिव्ह आहे. आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये वाढ होण्याचा अर्थ म्हणजे आपण दैनंदिन ज्यादा कॅलरी बर्न करीत आहोत. भूक कमी अर्थात पोटात जेवण कमी जात असेल तर पाणी प्यायला आहे. त्यामुळे पोट भरलेले राहते.

त्वचा चमकदार व उत्तम राहते

पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार बनते, त्वचेवरील छिद्रे गायब होतात. त्वचेला विशिष्ट प्रकारचा ब्राईट कलर येतो, आपल्या शरिरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. पाणी त्वचेला नैसर्गिक रुपाने हायड्रेटेड आणि मॉईस्चराइज ठेवते. सकाळी पाणी पिण्याचा खूप फायदा होतो.

लाळ बनवण्यास मदत

पाण्याची हायड्रेशनसाठी मोठी मदत होते. त्यातूनच लाळ बनण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. आपल्या तोंडात लाळ बनणे महत्त्वपूर्ण आहे. कारण तोंड जर कोरडे असेल तर आपल्याला कोरड्या तोंडावाटे आजारपण येऊ शकते. यातून मधुमेहासारख्या गंभीर आजारालाही निमंत्रण मिळू शकते. (Know the water benefits, beneficial for skin and weight loss)

इतर बातम्या

अमेरिकेतील सर्वात मोठ्या तेल पाईपलाईनवर सायबर हल्ला; भारतात पेट्रोल अन् डिझेलच्या किमती भडकणार

Black Rice Benefits | आरोग्यासाठी फायदेशीर काळा तांदूळ, इतिहास जाणून हैराण व्हाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.