AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचके रेहना रे बाबा…! काचेची बाटली फ्रीजमध्ये ठेवायची नसते… कारण माहीत आहे का ?

Glass Bottle In Freezer : बरेच लोक काचेच्या बाटलीत पाणी भरून थेट फ्रीजरमध्ये ठेवतात. पण असे केल्याने खूप मोठे नुकसान होऊ शकते.

बचके रेहना रे बाबा...! काचेची बाटली फ्रीजमध्ये ठेवायची नसते... कारण माहीत आहे का  ?
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 21, 2023 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसांत बर्फ आणि थंड पाण्याचा (cold water and ice) सर्वाधिक वापर होतो. काही लोक थंड पाणी साठवण्यासाठी वॉटर कुलरमध्ये बर्फ ठेवतात. त्याच वेळी काही लोक ग्लास किंवा प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवतात. पण अनेकजण काचेच्या बाटलीत (glass bottle) पाणी भरूनही ती थेट फ्रीजरमध्ये ठेवतात. मात्र असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. असं का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं कारणही समजून घेऊया. फ्रीजरमध्ये थंड तापमान जास्त असते, ज्यामुळे काचेची बाटली फुटू (crack) शकते.

फ्रीजरमध्ये का तडकते काच ?

पाण्याने भरलेली काचेची बाटली फ्रीजरमध्ये ठेवली असता, फ्रीजरच्या आतल्या तापमानामुळे पाणी गोठते म्हणजेच बर्फ बनते. जेव्हा पाणी गोठते तेव्हा त्याची घनता कमी होते कारण बर्फ पाण्यापेक्षा कमी डेन्सिटीचा असतो. यामुळे द्रव्यमान स्थिर होते कारण पाणी बाहेर काढले जात नाही किंवा त्यातून कोणत्याही प्रकारची गळती होत नाही.

साध्या-सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, त्यामुळे त्याचे प्रमाण वाढते आणि बर्फ जास्त जागा व्यापतो. यामुळे बर्फ जास्त जागा घेत असल्याने बाटली फुटू शकते. तथापि, काचेच्या बाटलीमध्ये क्रॅक येऊ शकतो की नाही हे पाण्याच्या प्रमाणावरही अवलंबून असते.

प्लास्टिकच्या बाटलीतही ठेवू नका पाणी

कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फ्रीजमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमध्ये अधिक बॅक्टेरिया असतात. फ्रीजमध्ये पाणी ठेवताना चुकूनही स्वस्त प्लास्टिकची बाटली वापरू नका. अशा बाटलीमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढू लागतात. तसेच फ्रीजमध्ये बाटली ठेवायची असेल तर उत्तम दर्जाची बाटली वापरा. या व्यतिरिक्त, पाण्याची प्लास्टिकची बाटली नेहमी 2 ते 3 दिवसांत स्वच्छ धुवावी. जेणेकरून तुम्ही कोणत्याही बॅक्टेरियाच्या संसर्गापासून सुरक्षित राहाल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.