AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Korean Glass Skin Secret : कोरियन मुलींसारखी त्वचा करायची चमकदार ? व्हॅलेंटाईन वीकमध्ये हे पदार्थ खाऊनच पाहा

कोरियन महिलांच्या त्वचेबद्दल बोलताना बहुतेक जण 10 स्टेप स्किनकेअर रूटीनचा उल्लेख करतात. पण खरं सांगायचं तर त्यांच्या त्वचेचा नैसर्गिक ग्लो फक्त क्रीम्समधून नाही, तर रोजच्या आहारातून येतो. तिथल्या महिला फार कडक डाएट पाळत नाहीत. त्या साधं, पोषक आणि संतुलित अन्न खातात ज्यात ताज्या भाज्या, फळं, पुरेसं पाणी आणि हलकं घरचं जेवण असतं. असा आहार त्वचेला आतून पोषण देतो, डलनेस कमी करतो आणि चेहऱ्यावर स्वच्छ, काचेसारखी चमक टिकवून ठेवायला मदत करतो.

Korean Glass Skin Secret : कोरियन मुलींसारखी त्वचा करायची चमकदार ? व्हॅलेंटाईन वीकमध्ये हे पदार्थ खाऊनच पाहा
Diet For Korean Glass Skin Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 07, 2026 | 2:22 PM
Share

Diet For Korean Glass Skin : जर तुम्हालाही कोरियन मुलींसारखी स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसणारी त्वचा हवी असेल, तर फक्त स्किनकेअर पुरेसं नाही. त्यांच्या त्वचेच्या सौंदर्यामागचं खरं गुपित त्यांच्या आहारात दडलेलं आहे. त्या कोणताही कडक डाएट फॉलो करत नाहीत; उलट त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयीच अशा असतात ज्या त्वचेला आतून पोषण देतात. साधं, ताजं आणि संतुलित अन्न घेतल्यामुळे त्वचा निरोगी राहते, नैसर्गिक ग्लो येतो आणि चेहऱ्यावर कायम फ्रेशपणा दिसून येतो.

डाएट तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरियन लोकांच्या चमकदार आणि टवटवीत त्वचेचं रहस्य फक्त के-ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये नाही, तर त्यांच्या आहारात आहे. ते जे खातात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो. कोरियन डाएटमध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या त्वचेला निरोगी, फ्रेश आणि नैसर्गिकरित्या चमकदार ठेवतात ते आज जाणून घेऊया.. तुम्ही व्हॅलेंटाईन वीकमध्ये आणि इतरवेळीही हे पदार्थ खाऊन कोरियन मुलींसारखी तुमची त्वचा चमकदार आणि गुळगुळीत करू शकता.

हायड्रेशनकडे विशेष लक्ष :

कोरियन लोक केवळ भरपूर पाणी पिण्यावरच भर देत नाहीत, तर पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थही आहारात समाविष्ट करतात. काकडी, टरबूज यांसारखी फळं आणि भाज्या त्यांच्या रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग असतात. यामुळे शरीरासोबतच त्वचाही आतून हायड्रेट राहते. त्वचेला पुरेसं पाणी मिळालं की ती अधिक निरोगी दिसते आणि नैसर्गिक चमक आपोआप येते.

प्रत्येक जेवणात फर्मेंटेड पदार्थांचा समावेश :

कोरियन आहारात किमचीला विशेष महत्त्व आहे. नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण प्रत्येक वेळी किमची खाल्ली जाते. फर्मेंटेड पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवायला मदत करतात. जेव्हा गट हेल्थ चांगली असते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसतो. निरोगी पचनामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि तेजस्वी दिसते तेही कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटशिवाय.

मासे आहाराचा महत्त्वाचा भाग :

कोरियन लोक नियमितपणे मासे आणि टोफू खातात. यामुळे शरीराला ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि कोलेजन मिळते. हे घटक त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात, एजिंगचे परिणाम कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. योग्य आणि संतुलित आहार कोणत्याही क्रीम किंवा सीरमपेक्षा अधिक प्रभावी ठरतो.

भरपूर प्रमाणात भाज्यांचं सेवन :

कोरियन जेवणात विविध प्रकारच्या भाज्यांचा मुबलक वापर असतो. भाज्यांमधून फायबर, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक मिळतात. हे शरीरातील सूज कमी करतात, त्वचेला निरोगी ठेवतात आणि वाढत्या वयाचे परिणाम नैसर्गिकरीत्या मंदावतात.

हेल्थ आणि स्किन यांचा थेट संबंध :

कोरियन डाएटवरून स्पष्ट होतं की पचनसंस्था जितकी मजबूत, तितकी त्वचा अधिक सुंदर. किमचीसारख्या फर्मेंटेड पदार्थांतून प्रोबायोटिक्स, माशांमधून ओमेगा-3, तर पाणी आणि भाज्यांमधून संपूर्ण पोषण मिळतं. जेव्हा पोट निरोगी राहतं, तेव्हा त्याची झळक चेहऱ्यावर आपोआप दिसून येते.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....