AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळे कपडे धुतल्यानंतर त्यांचा रंग फिकट होऊ लागतो? ‘या’ जबरदस्त ट्रिक्सनंतर दिसतील चमकदार

तुम्ही जर काळे कपडे योग्यरित्या धुतले तर ते वर्षानुवर्षे नवीन दिसू शकतात. फक्त या हॅक्सचा वापर केल्यास काळ्या कपड्यांचा रंग फिकट होणार नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण या हॅक्सबद्दल जाणून घेऊयात.

काळे कपडे धुतल्यानंतर त्यांचा रंग फिकट होऊ लागतो? 'या' जबरदस्त ट्रिक्सनंतर दिसतील चमकदार
Black clothes
| Updated on: Dec 11, 2025 | 4:37 PM
Share

पांढऱ्या रंगाचे कपडे धुताना त्यांचा रंग फिकट होऊ नये म्हणून आपण त्यांना चमकदार ठेवण्यासाठी अनेक ट्रिक्स वापरत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या काळ्या रंगाच्या कपड्यांना जसे की जीन्स, टी-शर्ट, स्वेटशर्ट तसेच शर्ट यांनाही विशेष काळजी घ्यावी लागते? कारण आपल्यापैकी अनेकांना काळ्या रंगाचे कपडे परिधान करायला खूप आवडतात. काळ्या रंगाच्या कपड्यामधून एक वेगळाच लुक मिळतो. परंतू हेच आवडीचे काळे कपडे धुतल्यानंतर जुने तसेच रंग फिकट दिसू लागतो. तर या कपड्याची शोभा कमी होते. जर काळ्या रंगाच्या कपड्यांचा रंग फिका पडत असेल तर या काही उत्तम ट्रिक्स आहेत ज्याचा अवलंब केल्यास तुमचे कपडे चमकदार दिसतील. चला तर मग या ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.

काळे कपडे धुण्याची योग्य पद्धत

आपण अनेकदा पांढरे आणि रंगीत कपडे वेगवेगळे धुतो. अशातच डार्क रंगाचे कपडे देखील शेड्सनुसार वेगळे करून धुतले पाहिजे काळा, डार्क निळ्या रंगाचे कपडे आणि डार्क लाल रंगाचे कपडे एकत्र धुण्याने त्यांचा रंग टिकून राहण्यास मदत होते आणि रंग बदलण्याचा धोका कमी होतो.

– गरम पाण्यामुळे काळे कपडे लवकर फिकट होऊ शकतात आणि आकुंचन पावू शकतात. रंगांची चमक टिकवून ठेवण्यासाठी थंड पाण्याने काळे कपडे धुणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– काळ्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये सुकवू नका. यामुळे कपड्यांचा रंग खराब होऊ शकतो. त्याऐवजी हे कपडे सुर्यप्रकाशात वाळत घाला.

– एकाच वेळी खूप कपडे मशीनमध्ये टाकून धुतल्यास ते व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत आणि एकमेकांवर घासतात, ज्यामुळे ते लवकर झिजतात. तसेच काळे कपड्यांचा रंग देखील फिकट होऊ शकतो. जास्त लोडिंगमुळे फेडिंग आणि पिलिंग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कापडे धुताना कमी कपडे मशीनमध्ये टाकून धुवा.

– परिधान केलेले नवीन कपडे प्रत्येक वेळी धुणे आवश्यक नाही. जीन्स, स्वेटशर्ट आणि पायजमा यांसारखे कपडे वारंवार परिधान केल्यानंतरही स्वच्छ राहतात. जास्त वेळा धुण्यामुळे यांचा रंग फिकट होऊ शकतो आणि कापड खराब होऊ शकते. आवश्यक असल्यास, कपडे हवाबंद करा किंवा फॅब्रिक फ्रेशनर स्प्रे वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.