फळांचे साल तुम्ही फेकून देत आहात तर थांबा, ब्रँडलाही मागे टाकेल असा फेसपॅक बनवण्याची साधी पद्धत, वाचा…

आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात.

फळांचे साल तुम्ही फेकून देत आहात तर थांबा, ब्रँडलाही मागे टाकेल असा फेसपॅक बनवण्याची साधी पद्धत, वाचा...
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 5:48 PM

मुंबई : आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात. आणि हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत चांगले आहे याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रीमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक देखील येते. अशा काही फळांच्या सालांबद्दल जाणून घ्या जे अधिक चांगले फेस मास्क म्हणून वापरले जाऊ शकतात. (Make a face pack from the fruit peel)

संत्र्याची साल संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

पपईची साल पपईची साल स्वच्छ करून बारीक करून घ्या आणि पेस्ट तयार करा. मग त्यात लिंबू आणि मध घाला आणि चेहऱ्यावर लावा. जर आपल्याकडे वेळ नसेलतर असेल तर आपण हलक्या हातांनी त्वचेवर देखील घासू शकता.  जे कोरड्या त्वचेला ओलावा देते. त्वचेची टॅनिंग देखील काढून टाकते.

आंब्याचे साल आंब्याच्या सालाचे थोडेसे पीठ करून घ्या त्याची पेस्ट तयार करा त्यात मध मिसळा आणि गळ्यापासून तोंडावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवर बॅक्टेरियाच्या बुरशीपासून बचाव करतात तसेच वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.

केळीचे साल केळीचे साल चेहर्‍यावरील डाग काढते. केळीच्या सालाची पेस्ट बनवण्याची गरज नाही. केळीची साल चेहऱ्यावर घासून घ्या आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. केळीमध्ये वंगण घालणारी नैसर्गिक चरबी आणि प्रथिने असतात ज्या आपल्या त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

खरबूजची साल खरबूज लगदा वेगळा केल्यानंतर फळाची साल फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि काॅटनच्या कपड्याने गाळा आणि हे एका बाॅटलमध्ये ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला असे वाटते की त्वचा खराब होत आहे तेव्हा लगेच हे चेहऱ्याला लावा.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

(Make a face pack from the fruit peel)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.