लॅपटॉपवर काम करत असताना ‘डोळे’ सारखे जड पडत असतील तर या गोष्टी करा!

आपल्या हातात आणि पायामध्ये असे बरेच पॉईंट आहेत की, त्यांच्या सहाय्याने आपण डोके दुखी, पाठ दुखी या सारख्या अनेक त्रासांपासून मुक्तता मिळू शकतो.

लॅपटॉपवर काम करत असताना 'डोळे' सारखे जड पडत असतील तर या गोष्टी करा!

मुंबई : आपल्या हातात आणि पायामध्ये असे बरेच पॉईंट आहेत की, त्यांच्या सहाय्याने आपण डोके दुखी, पाठ दुखी या सारख्या अनेक त्रासांपासून मुक्तता मिळू शकतो. नैसर्गिक औषधांमध्ये या पॉईंट एक्यूप्रेशर असे म्हणतात. जर हे पॉईंट नेहमीच दाबले तर बर्‍याच रोगापासून तुम्ही दुर राहू शकतात. (Do this if your eyes are heavy while working on a laptop)

डोळे जड पडल्यावर हे करा
बर्‍याचदा, सतत लॅपटॉपवर काम करणे किंवा बर्‍याच वेळापासून मोबाईलचा वापर केल्याने डोळे जड पडल्यासारखे वाटतात. अशावेळी पायाचे बोट दाबा हळूहळू तुम्हाला बरे वाटेल. दररोज असे केल्याने डोळ्यांची दृष्टीही चांगली होईल.

हृदयविकार
जर हृदयरोगी देखील एक्यूप्रेशर थेरपीची मदत घेत असतील तर त्यांच्या बर्‍याच समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. हिवाळ्यादरम्यान, हृदयरोग्यांना आरोग्याबद्दल खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. अशा स्थितीत ते पायाच्या दोन बोटांमध्ये दाबा. यामुळे हृदय गती सुधारते.

डोकेदुखी कमी करा
दररोज दोन्ही बोट्यांच्या मध्यभागी दाबा, आणि असे तुम्ही सतत केले तर कायमची तुमची डोकेदुखीची समस्या सुटेल, तसेच मेंदूचे कार्य सुधारेल.
पाठदुखी
जर तुम्हाला पाठदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवली असेल तर पायांच्या मध्यभागी दाबा. येथे उपस्थित बिंदू आतड्यांशी जोडलेला आहे. यामुळे पाठीच्या दुखण्याचा त्रासही बरा होतो.
यकृत समस्या
यकृताची समस्या असल्यास अंगठा व जवळच्या बोटाच्या दरम्यान पायाचे वरचे भाग दाबा. यामुळे मोठा आराम मिळेल.

या गोष्टी लक्षात ठेवा
1. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आजार असेलतर तज्ञांच्या सल्ल्याशिवाय काहीही हे करू नका. चुकीचा पॉईंट दाबल्याने समस्या संपण्या ऐवजी आणखी उद्भवू शकते. तसेच, इतक्या फास्ट दाबू नका की, त्या अवयवातील समस्या वाढेल.
२. गर्भवती महिलांनी एक्यूप्रेशर थेरपी टाळली पाहिजे. जर चुकीचा पॉईंट चुकीचा दाबला गेला तर तो आई आणि बाळासाठी हानिकारक असू शकतो.

संबंधित बातम्या : 

Pre Menopause | चिंता सोडा, निवांत व्हा! ‘प्री-मेनोपॉज’नंतरही घेता येईल मातृत्वाचा आनंद…

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

(Do this if your eyes are heavy while working on a laptop)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI