मखाना की काळे चणे…आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणते? जाणून घ्या
मखाना आणि भिजवलेले काळे चणे हे दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय आहेत. अशातच मखाना की काळे चणे या दोन्हींपैकी नेमकं कोणतं सेवन तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे ते आपण आजच्या लेखात तज्ञांकडून जाणून घेऊयात.

आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण हेल्दी पदार्थांचे सेवन करत असतो. मखान्याचे सेवन देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते कारण ते पोषक तत्वांचे भांडार आहे, बहुतेक लोकं त्यांच्या नाश्त्यात मखाने आवडीने खातात. अशातच काळे चणे हे देखील स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय मानले जातात. खरं तर, मखाना आणि काळे चणे दोन्ही शरीराला मजबूत बनवण्यास मदत करतात. मखाना हा फायबरचा चांगला स्रोत आहे आणि तर चणे हा लोहाचा चांगला स्रोत आहे. दोन्ही हेल्दी डाएटसाठी चांगले आहेत.
आजकाल टिफिनमध्ये सुद्धा भाजलेले मखाना व रात्री भिजवलेले काळे चणे देखील घेऊन जातात. दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जातात, परंतु या दोघांपैकी कोणते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तर हाच संभ्रम दूर करण्यासाठी तज्ञांकडुन याबद्दल जाणून घेऊयात.
भाजलेले मखाना की भिजवलेले काळे चणे कोणते जास्त फायदेशीर आहे?
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रिया पालीवाल यांनी सांगितले की, भाजलेले मखाने आणि भिजवलेले काळे चणे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु त्यांच्या पोषक तत्वांमध्ये आणि बनवून खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे. भाजलेले मखान्यांमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम आहे, जे कमी तेलात किंवा तेल न टाकता भाजून स्नॅक म्हणून सहज खाऊ शकतो. तसेच मखाने हलके, सहज पचण्याजोगे आहे आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्या किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे, कारण त्यात कॅलरीज कमी असतात आणि पोट बराच काळ भरलेले राहते.
भिजवलेले चणे हे प्रथिने, लोह, फॉस्फरस, फायबर आणि व्हिटॅमिन बी6 चा उत्कृष्ट स्रोत आहे. चणे शरीराला ऊर्जा प्रदान करतात, स्नायूंना आधार देतात. त्याच बरोबर यांच्या सेवनाने तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. काळे चणे भिजवल्याने शरीरात पोषक तत्वांचे शोषण सुधारते आणि ते पोटासाठी सहज पचण्याजोगे बनते. जर तुम्हाला कोणत्याही पोटाच्या समस्या नसतील, तर सकाळी लवकर भिजवलेले चणे खाणे अधिक फायदेशीर ठरते, विशेषतः मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि सक्रिय लोकांसाठी. त्याच वेळी, जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हलका आणि सहज पचणारा नाश्ता करायचा असेल, तर भाजलेले मखाने हा एक चांगला पर्याय आहे. आहारात दोन्हीचा संतुलित पद्धतीने समावेश करणे आरोग्यासाठी चांगले ठरेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
