AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango benefits : केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा, जाणून घ्या याचे बहुगुणी फायदे

आंब्यामध्ये विटामीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे असतात. जी शरीरातील विविध समस्यांपासून आपली मुक्तता करतात. (Mango is not only delicious but also beneficial for health, know its many benefits)

Mango benefits : केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा, जाणून घ्या याचे बहुगुणी फायदे
केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: May 22, 2021 | 7:08 AM
Share

मुंबई : उन्हाळा ऋतू जवळ आला की सर्वांना ओढ लागते ती फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे फळ म्हणजे आंबा. एखादा क्वचितच असा अपवाद असेल ज्या व्यक्तीला आंबा आवडत नसेल. रसाळ, मधाळ असे गुणधर्म असलेला हा आंबा केवळ चवीष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आंब्यामध्ये विटामीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे असतात. जी शरीरातील विविध समस्यांपासून आपली मुक्तता करतात. त्वचेपासून पोटापर्यंत सर्व समस्या दूर करतात. (Mango is not only delicious but also beneficial for health, know its many benefits)

आंब्याचे आरोग्यदायी फायदे (Benefits of Mango)

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

आंबा हे बहुगुणी फळ आहे. याचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. आंब्याचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे आपण कोणत्याही आजाराचा सहज सामना करु शकतो. आंब्यामध्ये विटामीन ए, विटामीन के, विटामीन ई, विटामीन बी मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली प्रतिकारशक्ती बळकट होते.

निरोगी हृदय

निरोगी हृदयासाठी आंबा उपयुक्त मानले जाते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीरातील रक्तवाहिन्या शांत ठेवतात. यामुळे हृदयाचा ठोके आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. मॅन्गिफेरीन नावाचा अँटीऑक्सिडंट हृदयाच्या पेशींना जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतो.

पचनक्रिया सुधारते

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या पचनासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळतो. बद्धकोष्ठता ग्रस्त लोकांनी आंब्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. यामुळे आंब्याचे सेवम केल्याने विटामीन सी ची कमतरता भरुन निघते. शरीरातील कोलेजेन नावाची प्रथिने तयार करण्यासाठी विटामीन सी आवश्यक असते. यामुळे केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच आपण सुरकुत्या आणि रुक्ष केसांपासून सुटका मिलू शकता.

डोळ्यांसाठी फायदेशीर

आंब्यामध्ये विटामीन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. विटामीन ए ची कमतरता असल्यास रुक्ष डोळे, रात्री कमी दिसणे आदि समस्या उद्भवू शकतात. यातील अँटीऑक्सिडेंट ल्यूटिन आणि इतर घटक देखील डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवू शकतात. (Mango is not only delicious but also beneficial for health, know its many benefits)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

इतर बातम्या

Tesla विरोधात चीन आक्रमक, आधी लष्कराकडून बंदी, आता सरकारी कार्यालयांमध्ये नो एंट्री

12 आमदारांच्या नियुक्त्यांवर कधी निर्णय घेणार? HC ने राज्यपालांकडे मागितले स्पष्टीकरण

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?