AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे….

रळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात.

गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिण्याचे 'हे' फायदे....
| Updated on: Mar 05, 2021 | 3:59 PM
Share

मुंबई : नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. गर्भावस्थेमध्ये तर नारळ पाणी सर्वात चांगले मानले जाते. जास्तीत महिलांनी गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिले पाहिजे. (Many benefits of drinking coconut water during pregnancy)

-गर्भावस्थेमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या असणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत नारळ पाणी जास्त पिले पाहिजे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

-बऱ्याच महिलांना चहा आणि काॅफी पिण्याची सवय असते. मात्र, गर्भावस्थेमध्ये डाॅक्टर चहा आणि काॅफी नका घेऊ असा सल्ला देतात अशावेळी नारळ पाणी हा एक उत्तम उपाय असू शकतो. दिवसातून आपण कितीही वेळ नारळ पाणी पिऊ शकतो.

-गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली होते तसेच मूत्रपिंडाचे कार्य देखील सुधारते.

-नारळ पाण्यामुळे आई आणि बाळाला दोघांनाही चांगले पोषक तत्व मिळतात यामुळे गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिणे आवश्यक आहे.

-कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक असू शकते. एक ग्लास नारळाचे पाणी पिऊन एखाद्या महिलेला पुरेसे पोषक मिळतात. याशिवाय नारळपाणी नेहमीच ताजे प्या. शिळे किंवा खुले नारळ पाणी पिऊ नका. जर नारळ पाण्याची चव वेगळी लागत असेल तर ते नारळ पाणी पिणे शक्यतो टाळा.

-जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असेही नमूद केले आहे की, नारळ पाण्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. परंतु, याचवेळी हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे की, ते नैसर्गिकरित्या गोड आहे आणि फ्रुक्टोज आहे म्हणून, नारळाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह रूग्णांनी दररोज 1 कपपेक्षा (240 एमएल) जास्त नारळ पाण्याचे सेवन करू नये.

संबंधित बातम्या : 

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

(Many benefits of drinking coconut water during pregnancy)

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.