AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rutuja Ravan | मीरा रोडच्या मराठमोळ्या तरुणीचा देशात डंका, ऋतुजा रावणला ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद

Diadem Miss India 2020 या सौंदर्य स्पर्धेत मीरा रोडच्या ऋतुजा रावणला (Rutuja Ravan) द्वितीय उपविजेतेपद मिळालं

Rutuja Ravan | मीरा रोडच्या मराठमोळ्या तरुणीचा देशात डंका, ऋतुजा रावणला 'मिस इंडिया'चे उपविजेतेपद
डियाडेम मिस इंडिया 2020 उपविजेती ऋतुजी रावण
| Updated on: Jan 02, 2021 | 7:39 AM
Share

मीरा रोड : मीरा रोडला राहणारी मराठमोळी तरुणी ऋतुजा रावण (Rutuja Ravan) हिने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. दिल्लीत आयोजित डियाडेम मिस इंडिया 2020 (Diadem Miss India 2020) मध्ये द्वितीय उपविजेतेपद पटकावलं. मीरा रोडमधील घरी आल्यावर ऋतुजा रावणचा सत्कार करण्यात आला. (Mira Road Rutuja Ravan second runner up Diadem Miss India 2020)

ऋतुजा रावण सध्या एका विमान सेवा कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून नोकरी करते. Diadem Miss India 2020 च्या 2nd runnerup होण्यापर्यंत ऋतुजाचा प्रवास सोप्पा नव्हता. त्याचं कारण म्हणजे या क्षेत्रातील अनुभव अगदीच नगण्य होता.

नवीन क्षेत्र आणि प्रचंड स्पर्धा याची माहिती असतानाही केवळ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर तिने यश मिळवलं. वडिलांचं छत्र हरपलं असतानाही आपल्या आईचा आधार, या ताकदीवर ऋतुजा रावणने या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले… अँड रेस्ट इज द हिस्ट्री.

दिल्लीत एनसीआरच्या गुरुग्राम येथील किंग्डम ऑफ ड्रीम्समध्ये ब्युटी पेजेन्ट डियाडेम मिस इंडिया आणि मिसेस इंडिया लिगेसी 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. देश पातळीवर अनेक राज्यातून 25 स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मीरा रोडच्या ऋतुजा रावणने तृतीय स्थान पटकावत महाराष्ट्रचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकवला.

कल्पनेपलिकडचं यश

पहिल्या तीन क्रमांकात येईन, याची कल्पनाही नसल्याचं ऋतुजा रावण म्हणाली. माझी कल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचं पाहून मला अत्यानंद होत आहे. राष्ट्रीय स्तरावर मला माझ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला मिळालं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आज जरी मी विजेती असले, तरी मी मला मिळालेल्या अनुभवावरुन, माझी आई आणि सर्वच मित्रमंडळी यांच्या सहकार्याच्या आधारावर पुढे भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी बांधील असेन, तसा यशस्वी प्रयत्न मी नक्कीच करेन, असा विश्वासही ऋतुजाने व्यक्त केला. (Mira Road Rutuja Ravan second runner up Diadem Miss India 2020)

ऋतुजा रावण आणि तिच्या मातोश्री

“स्वतःला झोकून द्या, जग तुमच्या पाठीशी असेल”

मी एवढी मोठी नक्कीच नाही की तुम्हाला सल्ला द्यावा, तरीही एक सांगते की पराजीत होण्याचा भीतीने आपण आपला मार्गच सोडून द्यावा आणि स्पर्धेत भाग घ्यायच्या अगोदरच पराजय स्वीकारावा, असे करु नका. सर्वच मुलींनी अगदी विचारपूर्वक आपला मार्ग निवडावा आणि पूर्ण प्रयत्न, तयारी आणि मेहनत याच्या जोरावर स्वतःला झोकून द्यावे, मग पहा जग तुमच्या पाठीशी असेल, असंही ऋतुजा म्हणाली.

संबंधित बातम्या :

23 वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरला ‘मिस इंग्लंड’चा किताब

डॉक्टर-इंजिनिअरपेक्षाही तगडा पगार, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुलभाला 46.27 लाखांचं पॅकेज

(Mira Road Rutuja Ravan second runner up Diadem Miss India 2020)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.