‘या’ 3 गोष्टींचा रस मुलतानी मातीमध्ये मिक्स करून लावल्याने त्वचेवरील डाग होतील दूर
उन्हाळा सुरू झाला की त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. धूळ, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचा खराब होऊ लागते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. उन्हाळ्यात तुम्ही मुलतानी मातीमध्ये या गोष्टी मिक्स करून यांचा फेसपॅक बनवू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सुर्यप्रकाश आणि प्रदुषण यामुळे आपली त्वचा अगदी निस्तेज होते. तसेच या दिवसांमध्ये त्वचा निरोगी राहावी यासाठी आपण अनेक त्वचेसाठी प्रॉडक्ट वापरतो, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक प्रॉडक्टमध्ये कॅमिकल असतात, जी त्वरित चमक देऊ शकतात परंतु त्वचेचे दीर्घकालीन नुकसान देखील होऊ शकते. जास्त कॅमिकल उत्पादने वापरल्याने त्वचेची चमक कमी होऊ शकते आणि त्वचेच्या इतर समस्या वाढू शकतात, म्हणून आपण नैसर्गिक उत्पादने अधिक वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलतानी माती आपल्या आजींच्या काळापासून वापरली जात आहे आणि आजही लोकं मुलतानी माती त्वचेच्या समस्या दुर करण्यासाठी चेहऱ्यावर लावतात. जे त्वचेवरील तेल नियंत्रित करते आणि चेहऱ्यावरील चमक कायम ठेवते.
मुलतानी मातीमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, डाग आणि मुरुमे कमी करण्यास मदत करतात, परंतु जर तुम्ही मुलतानी मातीमध्ये या 3 गोष्टी मिक्स करून लावल्याने तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील. चला तर मग जाणून घेऊया हा फेस पॅक कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत.
मुलतानी माती त्वचेला चमक देते
मुलतानी माती क्लींजर आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करते. याचा दररोज वापर केल्याने तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील. हे त्वचेचे छिद्र साफ करते, अतिरिक्त तेल कमी करते, मृत त्वचेच्या पेशी कमी करते, मुरुमे देखील कमी करते आणि त्वचेची चमक अबाधित राहते.
मुलतानी मातीमध्ये हे 3 रस मिक्स
मुलतानी माती आणि बटाट्याचा रस
मुलतानी माती आणि बटाट्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी, एक बटाटा किसून त्याचा रस काढा, नंतर त्यात मुलतानी माती मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 15-20 मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला दिसेल की तुमची त्वचा चमकदार आणि गुळगुळीत होईल.
मुलतानी माती आणि टोमॅटोचा रस
मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचा रस मिक्स करून लावल्याने त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात. टोमॅटोचा रस त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि डाग दूर करण्यास मदत करतो आणि मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे टॅनिंगही दूर होते आणि चेहऱ्याचा चमक कायम राहतो.
मुलतानी माती आणि लिंबाचा रस
मुलतानी माती आणि लिंबाचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हा फेस पॅक लावल्याने टॅनिंग, पिंपल्स दूर होतात, त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी, तुम्ही हे घरगुती उपाय अवलंबले पाहिजेत, यामुळे उन्हाळ्यातील टॅनिंग, कोरडेपणा, डाग, मुरुम यासारख्या त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळेल आणि चेहरा डागरहित दिसेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
