उन्हाळ्याच्या दिवसात या पदार्थांचा जेवणात समावेश करा; जाणवणार नाही उष्णतेचा त्रास

Diet For Summer drink fruit Juice and Curd : रोजच्या खाण्याच्या सवयींमधील छोटा बदल तुम्हाला तंदुरुस्त ठेवू शकतो... उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे? तुमच्या आहारात कोणता बदल कराल? उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावेत? डाएट कसं असावं? वाचा सविस्तर...

उन्हाळ्याच्या दिवसात या पदार्थांचा जेवणात समावेश करा; जाणवणार नाही उष्णतेचा त्रास
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 3:44 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : मार्च महिन्याच्या मध्यावधीत आपण आहोत. सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेक समस्या जाणवू शकतात. अनेकदा आपण आजारीही पडू शकतो. अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. मात्र आहारात थोडासा बदल केला तर आपण या कडक उन्हाळ्यातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी रोजच्या खानपानाच्या सवयींमध्ये तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. काही पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला त्रास जाणवणार नाही. हे पदार्थ नेमके कोणते आहेत? कोणत्या फळांचा ज्यूस प्यावा? जाणून घेऊयात…

आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल?

मौसम कोणताही असो. तुमचा आहार तुमच्या शरिरावर परिणाम करतो. त्यामुळे सकस आहार असेल याची काळजी नेहमीच घेतली पाहिजे. शक्यतो लहानपणापासून खास आलेली भाजी – पोळी याचा जेवणात समावेश असू द्या.

या उन्हाळ्याच्या मौसमात तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करावा लागेल. तसं केल्यास तुमच्या शरिरात सकारात्मक बदल दिसतील. रोजच्या जेवणात एक तरी पातळ भाजी असेल याची काळजी घ्या. शिवाय गाजर, काकडी या सारख्या फळांचाही जेवणात समावेश करा. तसंच जेवताना तुम्ही दही देखील खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरिराचं तापमान कमी होण्यास मदत होईल.

फळं खावीत…

उन्हाळ्याच्या दिवसात शरिरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीदार फळांचा जेवणात समावेश करा. कलिंगड, खरबूज, द्राक्षे या सारखी फळं रोज खालली जातील, याकडे लक्ष द्या.

ज्यूस आणि ताक

उन्हाळ्याच्या दिवसात जितकं पाणी तुमच्या शरिरात जाईल, तितकं चांगलं…. त्यासाठी दिवसातून किमान एखादा तरी ज्यूस प्या… यात कलिंगड, खरबूज, पाईनअॅपल या फळांचा समावेश असू द्या. याशिवाय जितकं ताक प्याल तितकं शरिर ताजं तवानं राहतं. त्यामुळे शक्य होईल तेव्हा ताक आणि लस्सी प्या. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या.

टीप- ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करा. या टिप्स फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.