तुम्ही प्रेग्नंट असाल तर या 5 गोष्टी कधीही करू नका; हानी पोहोचवू शकते
महिलांना त्यांच्या प्रेग्नसीच्या काळात अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. डॉक्टर आराम आणि उत्तम आहार तर सांगतातच पण सोबतच महिलांनी प्रेग्नसीच्या काळात अशा काही गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नयेत. त्या करणे कटाक्षाने टाळल्याच पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊयात.

महिलांना त्यांच्या प्रेग्नसीच्या काळात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आराम, आहार हे तर गरजेच असतच पण सोबतच काही गोष्टी टाळायच्याही असतात. कारण प्रेग्नंट महिलांना केवळ स्वतःच्या आरोग्याचीच नव्हे तर त्यांच्या बाळाच्या आरोग्याचीही काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण जसेजसे महिने जातात तसे बाळ हळू हळू तयार होत असतं. त्याची वाढ होत असते. त्यासाठी प्रेग्नंट महिलेने खाण्या-पिण्याच्याबाबतीत तसेच काही सवयींच्याबाबत काळजी घेणे गरजेचे असते. प्रेग्नंट असताना महिलांनी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीही करू नयेत.
गर्भवती महिलेने कधीही करू नये अशा गोष्टी
धूम्रपान
प्रेग्नंट महिलांना धूम्रपान न करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. धूम्रपान केल्याने शरीरात कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, ज्यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. यामुळे बाळाचे वजन कमी होऊ शकते. तसेच आईलाही त्रास होऊ शकतो. त्यासाठी धूम्रपान अजिबात करू नये.
दारू
धूम्रपानाप्रमाणेच, मद्यपानाचा देखील बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. मद्यपानाचा मुलाच्या विकासावर परिणाम होतो.त्यामुळे अल्कोहोल देखील घेणे टाळावे.
कॉफी
कॉफीबद्दल, डॉक्टरही नेहमी म्हणतात की जास्त प्रमाणात कॉफी पिणे टाळले पाहिजे. त्यामुळे प्रेग्नंट महिलांनी तर नक्कीच कॉफीचे सेवन करणे थांबवले पाहिजे.आणि जर तुम्हाला जास्तच क्रेविंग होत असेल तर तुम्ही दिवसातून 1 कप कॉफी पिऊ शकता, परंतु तुमचे कॉफीचे सेवन 200 मिलीग्रामपेक्षा कमी असावे.
औषधे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, म्हणजेच प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध घेऊ नयेत. हे सामान्य माणसांना जेवढं लागू होतं त्याहीपेक्षा जास्त ते प्रेग्नंट महिलांना लागू होते. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कोणतेही औषध घेतल्याने बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. ही औषधे बाळाच्या मेंदूला किंवा फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतात. या औषधांचा आईवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यासाठी काही त्रास होत असेल तर थेट डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या पण मनाने कोणतेही औषधे घेणे टाळा.
सौंदर्यप्रसाधनांचा वापर
प्रेग्नंट महिलांनी कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर देखील मर्यादित करावा. कारण त्यामध्ये विविध रसायने असतात जी बाळाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करू शकतात.
जड सामान उचलू नये.
प्रेग्नंट असताना जड वस्तू, सामान उचलू नये. किंवा सुरुवातीच्या काळाच खाली वाकून कोणतेही काम करू नये. त्यामुळे आई आणि बाळ दोघांना हानी होऊ शकते. तसेच चालताना देखील नेहमी कशाचा तरी आधार घेऊनच चालावे.
