AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोसा बनवायचाय पण नॉनस्टिक तवा नाही? लोखंडी तव्यावर कसा बनवाल? जाणून घ्या ही सोपी ट्रिक

डोसा हा खवय्यांचा आवडता पदार्थ असतो, पण नॉनस्टिक तवा नसेल तर डोसा नीट होतोच असं नाही. अशावेळी बाजारात जाण्याऐवजी, घरातला लोखंडी तवाच नैसर्गिक नॉनस्टिक बनवा! या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही डोसा आरोग्यदायी आणि परफेक्ट बनवू शकता.

डोसा बनवायचाय पण नॉनस्टिक तवा नाही? लोखंडी तव्यावर कसा बनवाल? जाणून घ्या ही सोपी ट्रिक
non stick pan
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 4:37 PM
Share

डोसा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण रोज सकाळच्या घाईत परफेक्ट डोसा बनवणं हे काही सोपं काम नाही, विशेषतः जेव्हा तुमच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. कारण फक्त 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा लोखंडी तवा देखील नॉनस्टिकसारखा बनवू शकता. यामुळे डोसा न चिटकेल, न फाटेल आणि क्रिस्पीपणात तर एकदम झकास लागेल!

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नॉनस्टिक तव्यावर असणारी रासायनिक कोटिंग आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर लोखंडी तवा आयर्नचा नैसर्गिक स्रोत असून शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग, जाणून घेऊया ही देसी आणि स्मार्ट पाककृतीची ट्रिक.

लोखंडी तवा नॉनस्टिक बनवण्यासाठी 5 सोप्या स्टेप्स

1. तवा स्वच्छ करा

तवा जर जुना असेल आणि त्यावर तेलाचा थर किंवा गंज असेल, तर प्रथम स्क्रबरने तो नीट घासून घ्या. पूर्णपणे स्वच्छ व कोरडा असावा.

2. तवा गरम करा

गॅसवर ठेवून तवा नीट गरम करा, तोपर्यंत की त्यातून हलका धूर यायला लागेल. यामुळे तव्याची बाह्य पृष्ठभाग सक्रिय होते.

3. थोडं पाणी टाका आणि पुसा

गॅस मंद करा आणि थोडं पाणी तव्यावर टाका. हे पाणी तवा थोडं थंड करतं आणि उरलेली घाण निघते. मग कोरड्या कापडाने पुसून घ्या.

4. तेल लावून पसरवा

थोडंसं तेल टाका आणि सूती कपड्याने संपूर्ण तव्यावर नीट पसरवा. मग तेच कापड थोडंसं पिळून परत हलकं पुसा.

5. ही प्रक्रिया 2-3 वेळा करा

ही तेल लावण्याची व पुसण्याची प्रोसेस दोन-तीन वेळा करा. त्यामुळे एक नैसर्गिक कोटिंग तयार होतं जे डोसासाठी नॉनस्टिकसारखं काम करतं.

लोखंडी तव्याचे फायदे

1.लोखंडी तव्यावर स्वयंपाक केल्याने शरीराला नैसर्गिक लोह मिळतो.

2. लोखंड सारख्या प्रकारे तापतो, त्यामुळे डोसा एकसारखा कुरकुरीत होतो.

3. नॉनस्टिकवर असलेल्या केमिकल कोटिंगच्या धोक्यापासून मुक्तता मिळते.

काही उपयोगी टिप्स

  • डोसा घालण्यापूर्वी तवा फार थंड नको, नाहीतर डोसा चिकटेल.
  • तवा वापरल्यानंतर साबण न वापरता फक्त गरम पाण्याने व स्क्रबरने धुवा.
  • दरवेळी वापरल्यानंतर थोडं तेल लावून ठेवा, त्यामुळे तवा टिकाऊ राहतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.