Tourism: पाकिस्तानी लोक हनिमूनसाठी कुठे जातात? ‘ही’ आहेत लोकप्रिय पर्यटनस्थळे
पाकिस्तानमध्ये भारताइतकी सुंदर ठिकाणे नाहीत, मात्र अशी काही ठिकाणे आहेत, तिथे पर्यटकांची वर्दळ पहायला मिळते. या ठिकाणांबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. भारतासह परदेशातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी भारतात येत असतात. मात्र भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये भारताइतकी सुंदर ठिकाणे नाहीत, मात्र अशी काही ठिकाणे आहेत, तिथे पर्यटकांची वर्दळ पहायला मिळते. आपण पाकिस्तानात जाऊ शकत नाही, मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत, जिथे पाकिस्तानी लोक हनिमूनसाठी आणि सुट्ट्या घालवण्यासाठी येतात.
बादशाही मशीद
बादशाही मशीद ही पाकिस्तानातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या लाहोर शहरात आहे. ही मशीद 1673 साली औरंगजेबाने बांधली होती. या मशीदीतील हस्तकला पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात. ही पाकिस्तानमधील दुसरी सर्वात मोठी आणि आणि जगातील पाचवी सर्वात मोठी मशीद आहे. ईदच्या वेळी लाखो पाकिस्तानी लोक येथे थेट देतात.
नीलम व्हॅली

भारतातील काश्मीरमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत, तसेच पाकिस्तानमधील काश्मीरमध्येही सुंदर ठिकाणे आहेत. यातील एक ठिकाण म्हणजे नीलम व्हॅली. नीलम व्हॅली ही 13 हजर फूट उंच दोन शिखरांच्या मधील एक दरी आहे. या दरीच्या आजूबाजूला हिरवीगार जंगले आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी जोडपी हनिमून साजरा करण्यासाठी येतात.
अट्टाबाद तलाव

पाकिस्तानमधील अट्टाबाद तलाव हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा तलाव गिलगिट-बाल्टिस्तानमधील हुंझा व्हॅलीतील अट्टाबाद गावात आहे. हा तलाव हिवाळ्यात गोठते. त्यामुळे पाकिस्तानातील नवविवाहित जोडपी येथे फोटो काढण्यासाठी आणि हनिमून साजरा करण्यासाठी येतात.

देवसाई राष्ट्रीय उद्यान
देवसाई राष्ट्रीय उद्यान हे पाकिस्तानमधील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या उद्यानात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. यात हिमालयीन लांडगे, सायबेरियन आयबेक्स, लाल कोल्हे आणि पिवळे मार्मोट्स आहेत. या उद्यानातून बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येते गर्दी करतात.
