Ramdev Baba: निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘हा’ बदल, रामदेव बाबांनी दिला खास सल्ला
अनेक लोक दिवसातून दोनदा जेवण करतात, काही लोक दिवसातून चार ते पाच वेळा खातात. मात्र तुम्ही व्यायाम केला नाही आणि दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहिलात तर शरीरातील चरबी वाढते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी एका YouTube व्हिडिओमध्ये आहार कसा असावा आणि आरोग्य डायरी कशी असावी यावर भाष्य केले आहे.

आहारावर आपले आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करावा असे प्रत्येकाला वाटत असते. चांगला आहार घेतल्यामुळे आपला विविधआजारांपासून बचाव होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. सध्या आहाराबाबत प्रत्येकजण सावध होताना दिसत आहेत. अनेकजण चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आहारात विविध पदार्थांचा समावेश करताना दिसत आहेत. मात्र आपण आपल्या शरीराच्या गरजेनुसार पदार्थांचे सेवन केले पाहिजे. कारण खाताना झालेल्या चुकांचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
तुम्ही पाहिले असेल की, अनेक लोक दिवसातून दोनदा जेवण करतात, काही लोक दिवसातून चार ते पाच वेळा खातात. मात्र तुम्ही व्यायाम केला नाही आणि दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहिलात तर शरीरातील चरबी वाढते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. काही लोक वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपवास करतात. योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी एका YouTube व्हिडिओमध्ये आहार कसा असावा आणि आरोग्य डायरी कशी असावी यावर भाष्य केले आहे.
या सवयी बदला
योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये आरोग्य डायरीमध्ये तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या विषयांची नोंदणी करण्यास सांगितले आहे. तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा आरोग्यात कोणतेही बदल करू इच्छिता त्याची नोंद तुम्ही करू शकता. बाबांनी आहारातील चुकांवरही प्रकाश टाकला आहे, ते म्हणाले की, 99 टक्के लोक त्यांच्या खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करतात, पटापट खातात. जर कोणी त्यांना हळूहळू जेवायला सांगितले तर त्यांना वाईट वाटते. मात्र वेगाने खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्य डायरीत हळूहळू जेवण करण्याचा मुद्दा नक्की लिहा. तसेच जास्त किंवा अनहेल्थी खाणे टाळावे.
चुकीच्या पदार्थांचे कॉम्बिनेशन टाळा
रामदेव बाबांनी सांगितले की, दुधासोबत मीठ असे कॉम्बिनेशन असलेले पदार्थ खाणे टाळा. काही लोक दुधाच्या चहासह खारट बिस्किटे किंवा नमकीन खातात हे आरोग्यासाठी घातक आहे. बरेच लोक प्रथम रायता आणि नंतर खीर खातात. हे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
तुमच्या शरीराच्या गरजेनुसार अन्न खा
तुम्ही अन्न आणि इतर खाद्यपदार्थ शरीराच्या सवयीनुसार खाल्ले पाहिजेत. वात, पित्त आणि कफ असा त्रास होणार नाही. मधुमेहात, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने साखर वाढते, जास्त मीठ रक्तदाब वाढवते, जास्त तेलकट पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवतात आणि जास्त मिरचीमुळे एसिडिटी वाढते. जास्त तेलकट आणि थंड पदार्थ खाल्ल्याने कफ आणि सर्दी वाढते. तसेच जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने वात वाढतो, ज्यामुळे सांधे आणि पाठदुखी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शरिराच्या गरजेनुसार पदार्थांचे सेवन करावे.
