अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा पेरी-पेरी मसाला, टिकेल अगदी वर्षभर
कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी पेरी-पेरी मसाला वापरला की पदार्थाची चव अगदी लज्जतदार होते. तसेच फ्रेंच फ्राईज घेतले की त्यावर पेरी पेरी हा मसाला टाकून खायला अनेकांना आवडतो. तर हाच पेरी पेरी मसाला तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी देखील बनवू शकता. पेरी-पेरी मसाला बनवण्याची सोपी रेसिपी आजच्या लेखात जाणून घेऊयात.

पेरी-पेरी मसाला म्हंटल की फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा यांसारख्या चटपटीत पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा मसाला आहे. तर या पेरी पेरी मसाल्याशिवाय हे पदार्थ खाण्याची कल्पनाच आपण करू शकणार नाही. अशातच ज्या लोकांना चटपटीत चमचमीत खाण्याची सवय असते त्यांना पेरी पेरी मसाला खूप उपयोगी पडतो. तसेच या मसाल्याचा इतिहास बघायला गेलात तर खूप जुना आहे. खरंतर पेरी-पेरी ही एक आफ्रिकन मिरची आहे जी लहान पण खूप मसालेदार असते. तर या मिरचीचा वापर हजारो वर्षांपासून आफ्रिकन लोकं करत आहेत.तर ही मिरची पोर्तुगीज संशोधकांनी शोधून काढली आणि युरोपसह अनेक ठिकाणी घेऊन गेले आणि हळूहळू पेरी पेरी मिरची जगभरात लोकप्रिय झाली. दक्षिण आफ्रिकेत पेरी पेरी मिरची विशेषतः अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते आणि पेरी-पेरी चिकन हा अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे.
पेरी-पेरी मसाला भारतातही खूप लोकप्रिय आहे. तर या मसाल्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात जे लोकांना खायला खुप आवडते. यामध्ये पेरी-पेरी फ्राईज लहानांपासूप ते मोठ्यापर्यंत सगळयांना खायला खूप आवडते. हा मसाला भारतीय पद्धतीने तयार करणे खूप सोपे आहे आणि हा मसाला कमी वेळात तयार होतो.
पेरी-पेरी मसाला त्याच्या अनोख्या चवीमुळे सर्वांनाच खुप आवडतो. त्याची चवीत गोडवा आणि हलका तिखटपणा तसेच पेपरिका वापरल्याने संतुलित होते. तुम्ही पेरी पेरी मसाला घरी बनवू शकता आणि वर्षभर योग्य पद्धतीने साठवून ठेवू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण पेरी-पेरी मसाला बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
पेरी-पेरी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
2 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर,
2 टीस्पून लसूण पावडर
2 टीस्पून कांदा पावडर
1 टीस्पून सुके आले पावडर / सुंठ पावडर
1 टीस्पून ताजी काळी मिरी,
अर्धा टीस्पून काळे मीठ
अर्धा टीस्पून पांढरे मीठ
2 टीस्पून साखर
4 टीस्पून ओरेगॅनो
2 टीस्पून आमचूर पावडर
1 टीस्पून चिली प्लेक्स
पेरी-पेरी मसाला कसा बनवायचा?
सर्व साहित्य समान प्रमाणात घ्या. सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे सुकवून भाजून घ्या. त्यानंतर या मिरच्या थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात सुक्या लाल मिरच्या आणि वरील सर्व साहित्य एकत्रित करून ते एकदा मिक्सरमध्ये बारीक पूड तयार करा. अशा प्रकारे, तुमचा पेरी-पेरी मसाला सोप्या पद्धतीने तयार होईल.
मसाले असे साठवावा
पेरी-पेरी मसाला बारीक केल्यानंतर तो चाळणीतून चाळून घ्या. त्यानंतर हर मसाला गाळून हवाबंद डब्यात ठेवा. तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण तो ओला होऊ नये याची खात्री घेत राहा. हा मसाला महिनाभर खराब होत नाही. लक्षात ठेवा की ज्या डब्यात तुम्ही तो साठवत आहात त्यात अजिबात ओलावा नसावा.
