AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यासाठी वरदान आहे सदाफुलीचं फुलं, मधुमेहासह ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर

सदाफुलीचं झाड वर्षभर फुलांनी भरलेले असते. त्याची गुलाबी आणि पांढरी फुले खूप सुंदर दिसतात. पण ती जितकी सुंदर दिसतात तितकीच ती आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. चला तर मग आपण आजच्या या लेखात आरोग्यासाठी वरदान असलेल्या सदाफुलीचं फुलं कोणत्या समस्यासांठी फायदेशीर आहे ते जाणून घेऊया...

आरोग्यासाठी वरदान आहे सदाफुलीचं फुलं, मधुमेहासह 'या' समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर
periwinkle flowersImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 5:43 PM
Share

तुम्ही सदाफुलीचं झाड हे वर्षभर बहरलेलं राहते, म्हणूनच त्याला सदाफुली असे म्हणतात. सदाफुलीचं फुलं पांढर व गुलाबी रंगांची असल्याने ही तुमच्या बागेचं सौंदर्य वाढवतेच, पण तुम्हाला माहित आहे का, की या सदाफुलीच्या झाडाला आयुर्वेदातही त्याचे विशेष महत्त्व आहे. हो, सदाफुलीची फुले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर मग आपण आजच्या या लेखात सदाफुलीचं फुलं आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकतात आणि त्यांचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त

सदाफुलीचं फुल मधुमेहाच्या उपचारात वापरली जातात. त्यात असलेले अल्कलॉइड्स शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. म्हणून त्यांची फुले चघळल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते .

कर्करोगविरोधी गुणधर्म

सदाफुलीच्या या झाडामध्ये काही अशी संयुगे आढळतात, जी कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात. यासाठी सदाफुलीची फुले कर्करोगाचा धोका कमी करतात. अशातच तुम्ही या फुलांना कर्करोगावर उपचार मानू नका.

रक्तदाब नियंत्रण

सदाफुलींच्या फुलांचा अर्क उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्त परिसंचरण सुधारतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

जखमा भरून येणे आणि त्वचारोगांमध्ये फायदेशीर

सदाफुलींच्या फुलांचा आणि पानांचा लेप हे जखमा, फोड आणि एक्झिमा सारख्या त्वचेच्या समस्यांवर लावला जातो. कारण यामध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूरोधी गुणधर्म आहेत, जे संसर्ग रोखतात.

पचनसंस्था मजबूत करण्यास उपयुक्त

सदाफुलींच्या फुलांचा काढा सेवन केल्याने पोटाच्या गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. या काढ्यामध्ये असलेले गुणधर्म पाचक एंजाइम सक्रिय करून अन्नाचे पचन सुलभ करण्यास मदत करते.

मानसिक ताण आणि निद्रानाशापासून आराम

त्याचा सुगंध मनाला शांत करतो आणि ताण कमी करण्यास मदत करतो. काही लोकं सदाफुलींच्या फुलांचे तेल अरोमाथेरपीमध्ये देखील वापरतात, जे निद्रानाश दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

मलेरिया आणि तापात फायदेशीर

सदाफुलींच्या झाडांची पाने आणि फुले मलेरिया आणि डेंग्यू सारख्या तापांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. ते शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. तथापि या स्थितीत तुम्ही कोणतेही उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फुलांचा वापर करावा.

ते कसे वापरावे?

काढा- फुले आणि पाने पाण्यात उकळून हे पाणी काढा म्हणून सेवन करता येते.

पेस्ट- पाने आणि फुलांची पेस्ट तयार करून त्वचेवर लावली जातात.

अर्क- त्याचा रस मधात मिसळून पिऊ शकतो.

या खबरदारीची काळजी घ्या

गर्भवती महिलांनी सदाफुलींचे फुल किंवा पाने आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी वापरू नयेत. तसेव याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने उलट्या किंवा चक्कर येऊ शकते. कोणतेही औषध उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधोपचार करू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.