AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pomegranate : डाळिंब या आजारांवर आहे रामबाण उपाय, काय आहेत त्याचे फायदे

Pomegranate Benefits : डाळिंबात अनेक प्रकारचे घटक आढळतात जे आपल्या शरीराला महत्त्वाचे असतात. डाळिंब हे आरोग्यसाठी सुपरफूड मानले जाते. जे शरीराला अनेक आजारांपासून लांब ठेवते. हिमोग्लोबिन वाढवण्यात देखील डाळिंब मदत करते. डॉक्टर देखील डाळिंब खाण्याचा सल्ला देतात.

Pomegranate : डाळिंब या आजारांवर आहे रामबाण उपाय, काय आहेत त्याचे फायदे
Pomegranate
| Updated on: Dec 01, 2023 | 8:16 PM
Share

Benifits of Pomegranate : डाळिंब हे कोणत्याही फळापेक्षा कमी नाही. कारण डाळिंबाच्या लहान लाल बिया या पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असतात. डाळिंबात अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे अनेक रोग बरे करतात. एक डाळिंब शंभर आजारांना बरे करू शकते. डाळिंबमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनॉलिक्स, लोह, जस्त, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड असतात. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. डाळिंब खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. डोळे निरोगी राहण्यास मदत होते. गरोदरपणात देखील डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.

डाळिंब खाण्याचे फायदे

एनिमिया दूर करतो

डाळिंब खाल्ल्याने एनिमिया दूर होतो. जे लोक नेहमी  डाळिंब खातात त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहते. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशी निर्माण होतात ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मधुमेहात फायदेशीर

डाळिंबाची चव गोड असली तरी मधुमेही रुग्ण डाळिंब खाऊ शकतात. डाळिंबात आढळणारे मधुमेहविरोधी गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

पचन सुधारते

डाळिंबात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. डाळिंबामध्ये हेलिकोबॅक्टर पाइलोरी विरोधी घटक असतो ज्यामुळे पोटाचे आजार बरे होतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो पोटात आढळतो.

गरोदरपणात फायदा

डाळिंबात अँटिऑक्सिडंट घटक आढळतात जे गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटा सुरक्षित ठेवतात. डाळिंब खाल्ल्याने फोलेटची कमतरता भरून काढता येते. गर्भवती महिला आणि बाळांच्या आरोग्यासाठीही डाळिंब फायदेशीर असते.

हृदय निरोगी बनवते

डाळिंबात अँटीथेरोजेनिक आणि अँटीहाइपरटेन्सिव्ह घटक असतात जे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात. याच्या मदतीने हृदयाचे आरोग्यही सुधारता येते. म्हातारपणी विसरभोळेपणा, अल्झायमरचा आजारही डाळिंब खाल्ल्याने कमी होतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.