AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणींनोss नवऱ्यासोबत पोस्टात ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करा, 5 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळवा

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम बद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही खूप चांगली योजना आहे. या योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता आणि दर महा केवळ व्याजातून भरपूर पैसे कमवू शकता. चला जाणून घेऊया कसे.

मैत्रिणींनोss नवऱ्यासोबत पोस्टात ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करा, 5 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळवा
Follow us
| Updated on: Apr 14, 2025 | 7:06 PM

प्रत्येक व्यक्तीला आपला पैसा हा चांगल्या योजनेत गुंतवून चांगला नफा कमवायचा असतो. बँका आणि टपाल कार्यालयांकडून अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत, या योजनांमध्ये लोक आपले पैसे गुंतवून खूप चांगला नफा कमावू शकतात.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम बद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही खूप चांगली योजना आहे. या योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता आणि दर महा केवळ व्याजातून भरपूर पैसे कमवू शकता. चला जाणून घेऊया कसे.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम

पोस्ट ऑफिसमंथली इनकम स्कीममध्ये तुम्हाला तुमचे पैसे एकत्र गुंतवावे लागतात, त्यानंतर तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजातून कमाई करता. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे म्हणजेच 5 वर्षानंतर तुम्हाला गुंतवलेली पूर्ण रक्कम परत मिळेल. पोस्ट ऑफिसमासिक उत्पन्न योजनेत 7.4 टक्के व्याजदराने परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

पत्नीसोबत गुंतवणुकीचा दुहेरी फायदा

जर तुम्ही तुमचे खाते उघडून पोस्ट ऑफिसमंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही फक्त 9 लाखांपर्यंतच गुंतवणूक करू शकता, पण जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. असे केल्याने तुम्हाला व्याजापेक्षा जास्त कमाई होईल.

अशा गुंतवणुकीवर तुम्हाला 1 लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल

जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मासिक उत्पन्न योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर 7.4 टक्के वार्षिक दराने तुम्हाला फक्त व्याज म्हणून दरवर्षी 1,11,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही केवळ व्याजाच्या माध्यमातून 5 वर्षात एकूण 5,55,000 रुपये कमवू शकता.

पोस्ट ऑफिस बचत खाते

पोस्ट ऑफिस आपल्या बचत खात्यात ग्राहकांना खूप चांगला व्याजदर देते. पोस्ट ऑफिस बचत खात्याचे व्याजदर सर्व बँकांपेक्षा जास्त आहेत. हा व्याजदर वार्षिक 4 टक्के आहे. तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI आपल्या ग्राहकांना बचत खात्यात 2.70 टक्के व्याज देते. एवढेच नव्हे तर PNB च्या बचत खात्याचे व्याजदरही पोस्ट ऑफिसपेक्षा कमी आहेत. PNB आपल्या ग्राहकांना 2.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते.

( डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.