अंघोळीचं पाणी कसं हवं अन् कोणत्या भागावर प्रथम पाणी घ्यावं? प्रेमानंद महाराजांनी सांगितली शास्त्रीयदृष्ट्या आंघोळीची योग्य पध्दत

उत्तम शारीरीक आणि मानसिक स्वस्थ्यासाठी रोज अंघोळ करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण अंघोळीची नक्की योग्य पद्धत कोणती हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहित आहे. प्रेमानंद महाराजांनी आंघोळ करताना पाणी कसे हवे अन् कोणत्या भागावर प्रथम पाणी घ्यावे? म्हणजे त्यामुळे आपल्या शरीरासोबतच मनालाही त्याचा लाभ मिळेल, यासाठी प्रेमानंद महाराजांनी शास्त्रीयदृष्ट्या आंघोळीची योग्य पध्दत सांगितली आहे.

अंघोळीचं पाणी कसं हवं अन् कोणत्या भागावर प्रथम पाणी घ्यावं? प्रेमानंद महाराजांनी सांगितली शास्त्रीयदृष्ट्या आंघोळीची योग्य पध्दत
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 12:40 PM

अंघोळ हे आपल्या आयुष्यातील महत्वाचं आणि नित्यनेमाने करणार काम. आपण थकलेले असू किंवा कंटाळलेले असू अंघोळ केल्यावर फ्रेश वाटत.काहींना अंघोळीसाठी ककड पाणी आवडत तर कोणाला थंडगार. मुळात अंघोळ केल्याने फक्त शरीरच स्वच्छ होत असं नाही तर मन देखील प्रसन्न होतं.

यामुळेच उत्तम शारीरीक आणि मानसिक स्वस्थ्यासाठी रोज अंघोळ करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण तुम्हाला माहितीये का कि, अंघोळ करताना आपण बर्‍याच चुका करतो. आता तुम्ही म्हणाल की, अंघोळ करताना कसं काय चुका होऊ शकतात? तर याचच उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिल आहे.

अंघोळीची योग्य पद्धत

अंघोळ करताना आपण करत असलेल्या चुका कदाचित आपल्या लक्षातही येत नाहीत. जस की, आंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे हे अनेक लोकांना माहित नसतं, किंवा अंघोळीचं पाणी नेमकं कसं असावं? हे ही आपल्याला माहीत नसतं. प्रेमानंद महाराजांनी स्नानाची योग्य आणि शास्त्रीय पद्धत सांगितली आहे. जाणून घेऊयात ही पद्धत कशी असते ते.

अंघोळीचं पाणी नेमकं कसं असावं? अन् योग्य पद्धत

प्रेमानंद महाराज यांच्या म्हणण्यानुसार अंघोळीसाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करावा. थंड पाण्याने अंघोळ केल्याने अनेक प्रकारच्या विकारांपासून आराम मिळतो.  अंघोळ करताना सर्व प्रथम नाभीवर पाणी ओतले पाहिजे. मग यानंतर संपूर्ण शरीरावर पाणी ओतले पाहिजे. ब्रह्मचर्य पाळणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे स्नान करणे योग्य मानले जाते असे प्रेमानंद महाराज सांगतात.

तर सामान्य लोकांनी अंघोळ करताना सर्वप्रथम डोक्यावरून पाणी घेतले पाहिजे. जेणेकरून जे काही डोक्यातील विचार, गोंधळ सुरू असतो to शांत होण्यास मदत होते, एवढच नाही तर डोक्यावरून आंघोळ केल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

 अंघोळ करताना साबणाऐवजी काय वापरावं?

शास्त्रीयदृष्ट्या हे आंघोळीचे योग्य मार्ग मानले जातात असे प्रेमानंद महाराजांचे म्हणणे आहे. तसेच अंगावर साबण वगैरे वापरण्याची गरज नाही. माती किंवा नैसर्गिक उटण्यांचा वापर करून शरीर धुतलं तर शरीर स्वच्छ होतं असे प्रेमानंद महाराज सांगतात. तसेच केस धुताना रेठा किंवा कोणत्याही नैसर्गिक वस्तूने धुवावेत असा सल्लाही प्रेमानंद महाराज देतात.

शास्त्रानुसार स्नानाचे प्रकार किती?

दरम्यान शास्त्रानुसार स्नानाचे चार प्रकार असतात. सूर्योदयापूर्वी ताऱ्यांच्या छायेत केलेल्या स्नानाला ऋषीस्नान म्हणतात. ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान म्हणतात. तीर्थक्षेत्रातील नद्यांमध्ये केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. सूर्योदयानंतर खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्नान म्हणतात.

गृहस्थांसाठी कोणते स्नान चांगले?

गृहस्थांसाठी कधीही ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे चांगले मानले जाते. असे केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वच्छ राहते. अंघोळ करताना मंत्र जप करणे उत्तम मानले जाते. असे केल्याने केवळ मनच नाही तर शरीरही शुद्ध होतं.शिवाय डोक शांत राहतं, सकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो. अंघोळ करताना फक्त ओंकार (ओम) चा जप करणे देखील फायदेशीर ठरू शकतं.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....