AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Propose Day Wishes Marathi : तुमच्या प्रिय व्यक्तीला द्या ‘प्रपोज डे’च्या शुभेच्छा

Valentine week 2024 आज वैलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगण्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे.

Propose Day Wishes Marathi : तुमच्या प्रिय व्यक्तीला द्या 'प्रपोज डे'च्या  शुभेच्छा
प्रपोज डेImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 08, 2024 | 10:02 AM
Share

मुंबई : तरूणाई ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहात असते त्या वैलेंटाईन वीकला कालपासून सुरूवात झालेली आहे. आज वैलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगण्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. तुम्हाला जर एखाद्या प्रिय व्यक्तीला लग्नाला मागणी घालायची असेल तर आजचा दिवस अत्यंत खास आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज पुन्हा एकदा प्रपोज करून तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. त्यासाठी तुम्ही काही शुभेच्छा संदेशसुद्धा पाठवू शकता.

प्रपोज डे शुभेच्छा संदेश

नाही आजपर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुला सांगणार आहे…

नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकंच तुला सांगणार आहे…

Happy Propose Day!

स्पर्श तुझा व्हावा

अन् देह माझा चुरावा

हक्काने मिठीत तू घ्यावेस

जसा पाण्यावरी स्पर्श चांगण्यांचा असावा

Happy Propose Day!

तू हो म्हणालीस तर होईल

प्रत्येक क्षण खास

आयुष्यभर मिळेल का

मला तुझा सहवास?

Happy Propose Day!

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,

दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,

माहीत नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,

आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…

Happy Propose Day!

ओढ लागलीया तुला मिळवायची,

तू मला समजून घेशील का?

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं

प्रेम तुझं देशील का?

थांबव आता खेळ हा स्वप्नांचा

कायमची माझी होशील का?

Happy Propose Day!

प्रेमाचा खरा अर्थ

तू मला समजून सांगितलास

माझ्या आयुष्याचा खरा अर्थ

तू मला उमगवून सांगितलास

Happy Propose Day!

समुद्राला किनाऱ्याची साथ

चंद्राला चांदण्यांची साथ

तू फक्त दे माझ्या हातात हात

मी देईन तुला जीवनभर साथ

Happy Propose Day!

चंद्रास साथ जशी चांदण्यांची

तशी साथ तू मला देशील का?

जीवनाच्या या सुंदर प्रवासात

तुझा हात हाती देशील का?

Happy Propose Day!

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.