कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळी फायदेशीर, वाचा

शितल मुंडे, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Apr 26, 2021 | 7:03 AM

भारतीय खाद्य हे जगातील सर्वात पौष्टिक मानले जातात. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये विविध डाळींच्या वापर केला जातो.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळी फायदेशीर, वाचा
धान्य
Follow us

मुंबई : भारतीय खाद्य हे जगातील सर्वात पौष्टिक मानले जाते. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये विविध डाळींच्या वापर केला जातो. डाळी या आपल्या दैनंदिन आहाराचा मुख्य भाग असतात. सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनीही कोरोना कालावधीमध्ये डाळी खाणे किती महत्वाचे आहे हे सांगितले आहे. (Pulses are beneficial for boosting the immune system during the corona period)

देशभरात कोरोना आणि लॉकडाऊन स्थिती आहे. यामुळे ताज्या भाज्या आणि फळे मिळविणे थोडे अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण पौष्टिक आहारासाठी डाळी देखील घेऊ शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते.

डाळी आरोग्यासाठी फायदेशीर

डाळीमध्ये लोह, जस्त, जीवनसत्त्वे, सेलेनियम आणि लाइझिनसारख्या आवश्यक अमीनो अॅसिड असतात. हे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. तसेच यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहते. उन्हाळ्याच्या हंगामात मूग, मटकी आणि लाल चवळीचा आहारात समावेश केला पाहिजे, असा सल्ला रुजुता दिवेकर यांनी दिला आहे. कारण याचे पचन करणे फारच सोपे आहे. या डाळींमध्ये जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पदार्थ असतात. जी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अधिक प्रभावी आहेत.

कोणत्या लोकांनी डाळी खाल्ल्या पाहिजेत रुजुता यांच्या मते, कोरोना या साथीच्या रोगाशी झुंज देणाऱ्या लोकांनी जास्तीत-जास्त आहारात डाळीचे सेवन केले पाहिजे. यामुळे आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते. याशिवाय केस गळणे, पीसीओडी, सूज येणे, ताणतणाव आणि निद्रानाश यांच्याशी झुंज देणारे लोक यांनी जास्त करून मसूर आणि सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. यामुळे आपली साखर पातळी देखील नियंत्रित राहते.

डाळीचे सेवन कसे करायचे न्याहारीमध्ये डाळीचा समावेश निरोगी आहार म्हणून केला जाऊ शकतो. न्याहारीमध्ये तुम्ही डोसा / अडाई / घावन तयार करू शकता. तुम्ही डाळी भाजून खाऊ शकता. स्नॅक / चाट म्हणून तुम्ही मसूर देखील वापरू शकता. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डाळींबद्दल माहिती दिली आहे. कोविडमुळे रुजुता दिवेकर आरोग्याशी संबंधित विषयांवर चर्चा करीत असतात. त्याचबरोबर त्यांनी पारंपारिक हेल्दी पेया विषयी माहिती दिली होती.

संबंधित बातम्या : 

(Pulses are beneficial for boosting the immune system during the corona period)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI