New Year Resolution | नवीन वर्षात धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? मग ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी…

सिगरेट आणि तंबाखूमुळे भारतात दरवर्षी जवळपास दहा लाख लोक मृत्युमुखी पडतात. सिगरेट पेटवताच क्षणी त्याचे हानिकारक परिणाम शरीरावर दिसू लागतात.

New Year Resolution | नवीन वर्षात धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? मग ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी...

मुंबई : सिगरेट आणि तंबाखूमुळे भारतात दरवर्षी जवळपास दहा लाख लोक मृत्युमुखी पडतात. सिगरेट पेटवताच क्षणी त्याचे हानिकारक परिणाम शरीरावर दिसू लागतात. यामुळे जितके नुकसान सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीचे होते, तितकेच आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतात. जर, तुम्हालाही सिगरेट ओढण्याची सवय असेल, तर येत्या वर्षात ही सवय कायमची सोडण्याचा संकल्प करा. जेणेकरून तुमचे आरोग्यही चांगले होईल आणि भविष्यात तुमच्या कुटुंबातील लोकांनाही कुठल्याही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागणार नाही (Quit smoking is the best new year resolution).

संकल्प पूर्ण करण्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून यावेळेस तुम्ही धूम्रपान सोडण्याचा विचार केला असेल, तर तुम्हाला तुमची इच्छाशक्ती देखील बळकट करावी लागेल. कारण, त्याशिवाय काहीही शक्य होणार नाही. कोणतीही सवय बदलण्यासाठी किमान 30 दिवस ते 90 दिवसांचा कालावधी द्यावा लागतो. अशा परिस्थितीत संयम, नियम आणि सातत्य ही त्रिसूत्री आवश्यक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण असा संकल्प घेता, तेव्हा स्वतःसाठी बनवलेले नियम मोडू नका.

धुम्रपान सोडण्यास मदत करतील ‘या’ टिप्स :

– आपल्या सकाळची सुरुवात छान कोमट पाणी पिऊन करा. या कोमात पाण्यात लिंबाचा रस आणि मधदेखील घाला. सकाळी फ्रेश होण्यापूर्वी जर तुम्हाला सिगरेट ओढण्याची सवय असेल तर, हा उपाय केल्यास सिगारेटची तीव्र इच्छा कमी होईल. तसेच, पोटदेखील साफ होईल.

– जर तुम्हाला दर दोन ते तीन तासांत सिगरेट ओढण्याची सवय असल्यास, त्यावेळी अर्धा कप दूध प्या. दूध प्यायल्यानंतर पोट भरते आणि थोड्या वेळासाठी काहीही खावेसे वाटत नाही (Quit smoking is the best new year resolution).

– बडीशेप तंबाखूसाठी एक चांगला पर्याय आहे. जेव्हा आपल्याला तंबाखू किंवा सिगरेट घेण्याची तलफ येत असेल, तेव्हा तोंडामध्ये बडीशेप घाला आणि हळू हळू चावत राहा. यामुळे आपली पचनक्रिया सुधारेल तसेच, व्यसनातून मुक्त होण्यास देखील मदत होईल.

– सिगरेटचे व्यसन दूर करण्यासाठी व्हिटामिन सीयुक्त फळांचे सेवन अत्यंत लाभदायी आहे. म्हणून जेव्हा, तुम्ही घरी किंवा बाहेर असाल, संत्रे, मौसंबी, किवी, स्ट्रॉबेरी, अंजीर इत्यादी व्हिटामिन सीयुक्त फळे आपल्याबरोबर ठेवा. सिगरेटची तलफ लागल्यावर या फळांचे सेवन करा.

– आले आणि आवळा यांना किसून उन्हात वाळवून घ्या. त्यात लिंबू आणि मीठ घालून ते एका डब्यामध्ये भरून ठेवा. एका छोट्या डबीत भरून ती डबी नेहमी आपल्याजवळ ठेवा. जेव्हा सिगरेटची तलफ येईल, तेव्हा हे चूर्ण खाल्याने बरे वाटेल.

– कच्चा पनीर खाल्ल्यानंतर देखील बराच काळ खाण्याची इच्छा होत नाही. म्हणून, जेव्हा जेव्हा आपल्याला सिगरेटची तलफ येईल, तेव्हा आपण थोडे कच्चे पनीर खावे.

(Quit smoking is the best new year resolution)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI