तुझा अस्थमा बरा झाला का? सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न

लग्नानंतर प्रियांकाचा निकसोबतचा हा पहिला वाढदिवस होता. यानिमित्ताने निकने प्रियांकासाठी मियामी बीचवर एका विशेष पार्टीचे आयोजन केले होते. यात प्रियांका, नवरा निक जोन्स, आई मधु चोप्रा हे सहभागी झाले होते.

तुझा अस्थमा बरा झाला का? सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न

मुंबई : मेटा गालाच्या लूकपासून नवऱ्यासोबतच्या फोटोमुळे कायम चर्चेत असलेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. प्रियांकाने अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 18 जुलैला तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिचा पतीने तिला निक जोन्सने पार्टी दिली. यात प्रियांकाच्या सिगारेट ओढत असल्याच्या फोटोमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. दिवाळीत फटाके न उडवण्याचे आणि अस्थमा असल्याचे सांगणारी प्रियांका चक्क धुम्रपान करताना दिसल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला फटकारलं आहे.

लग्नानंतर प्रियांकाचा निकसोबतचा हा पहिला वाढदिवस होता. यानिमित्ताने निकने प्रियांकासाठी मियामी बीचवर एका विशेष पार्टीचे आयोजन केले होते. यात प्रियांका, नवरा निक जोन्स, आई मधु चोप्रा हे सहभागी झाले होते. या पार्टीतील काही फोटो नुकतंच व्हायरल झालेत. त्यात प्रियांका तिच्या आई आणि नवऱ्यासोबत सिगारेटचे ओढताना दिसत आहे. या फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

प्रियांकाने भारतीय चाहत्यांसह इतरांना फटाके वाजवू नका, त्यामुळे प्रदूषण होते  असे आवाहन केले होत. या आवाहनासोबतच प्रियांकाने तिला अस्थमा असल्याचेही सांगितले होते असा व्हिडीओ ट्विट गेल्या वर्षी दिवाळीत केले होते. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षापासून प्रियांका अस्थमाचा आजार आहे.

दरम्यान सिगारेट ओढतानाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला तिच्या अस्थमाची आठवण करुन दिली आहे. तर काहींनी सिगारेट ओढताना तुला अस्थमा आठवला नाही का? असे एका युझरने विचारले आहेत. तर काहींनी यापुढे आम्हाला शिकवू नकोस असा टोलाही प्रियांकाला लगावला आहे. तर काहींनी कालपर्यंत आम्हाला फटाके वाजवू नका त्याने प्रदूषण होते असे सांगणारी प्रियांका आता स्वत: सिगारेट ओढत आहे. त्यामुळे आता तुझा अस्थमा बरा झाला का असा प्रश्नही विचारला आहे.

जून 2018 पासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियांका आणि निकने डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहा महिने रिलेशनमध्ये राहिल्यानंतर 1 आणि 2 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानमधील जोधपूरजवळी उम्मैद भवन पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नानंतर 4 वेडींग रिसेप्शनचेही आयोजन केले होते. त्यावेळी या दोघांच्या विवाहदरम्यान जोरदार फटाक्यांची आतेशबाजी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले होतं.

View this post on Instagram

#phirherapherimemes #pherherapheri #priyankachopra #pr #nickjonas #johnylever

A post shared by Meme laya? (@meme_laya) on

संबंधित बातम्या : 

नवऱ्यासोबतच्या फोटोंमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा ट्रोल, बाहुबलीशी तुलना

PHOTO : प्रियांका आणि निकचे आतापर्यंतचे सर्वात रोमँटिक फोटो  

लग्नानंतर सहा महिन्यातच गरोदर असल्याची चर्चा, प्रियांका चोप्रा म्हणते…. 

Published On - 11:13 pm, Sun, 21 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI