रोजच्या त्याच-त्याच जेवणाला कंटाळलात? ‘या’ झणझणीत राजस्थानी भाज्या नक्की ट्राय करा!

शेव टोमॅटोची भाजी गुजरातमध्येही प्रसिद्ध आहे. परंतु, ती चवीला गोड असते. तर, याउलट राजस्थानी शेव टोमॅटोची भाजी ही तिखट असते.

रोजच्या त्याच-त्याच जेवणाला कंटाळलात? ‘या’ झणझणीत राजस्थानी भाज्या नक्की ट्राय करा!
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 2:16 PM

मुंबई : दररोज डाळ आणि साध्या भाज्या खाल्याने कंटाळा येतो आणि काहीतरी नवीन व मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी आपण काहीतरी चमचमीत बनवण्याचा विचार करत असतो, पण नेमकं काय बनवावं हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडलेला असतो. विशेषत: हिवाळ्यामध्ये अशा गरमागरम चमचमीत पदार्थांची तलफ सगळ्यांनाच येते. जर, आपण अशाच काही चमचमीत पदार्थांच्या शोधात असाल, तर या राजस्थानी भाज्या नक्कीच करून पाहा (Rajasthani Sev Tomato and Papad Sabzi Recipe).

  1. शेव टोमॅटोची भाजी

शेव टोमॅटोची भाजी गुजरातमध्येही प्रसिद्ध आहे. परंतु, ती चवीला गोड असते. तर, याउलट राजस्थानी शेव टोमॅटोची भाजी ही तिखट असते.

साहित्य : तेल, अर्धा वाटी हरभरे पीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, १ टेस्पून आले लसूण पेस्ट, दोन हिरव्या मिरच्या, दोन कांदे, दोन टोमॅटो, अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, एक चमचे लिंबाचा रस, पाणी, कोथिंबीर.

कृती : प्रथम कढईत तेल टाकून गरम करून घ्या. नेहमीच्या भाजीपेक्षा थोडे जास्त तेल घ्या. कारण राजस्थानी भाज्यांमध्ये तेल आणि तिखटाचे प्रमाण अधिक असते. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग घाला आणि फोडणी द्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घाला. 20 ते 30 सेकंद शिजवा. नंतर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मऊ झाला की, टोमॅटो घालून फ्राय करून घ्या. लक्षात ठेवा, कांदा संपूर्ण लाल करू नका. नंतर हळद, मिरची, कोथिंबीर आणि काश्मिरी मिरची घाला आणि तेल मसाल्यापासून वेगळे होईपर्यंत मसाले चांगले भाजून घ्या. नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी त्यात थोडे पाणी घाला आणि चांगली उकळी येऊ द्या. नंतर चवीनुसार मीठ घाला. भाजी व्यवस्थित उकळल्यानंतर त्यात शेव आणि लिंबाचा रस घालून, गॅस बंद करावा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा (Rajasthani Sev Tomato and Papad Sabzi Recipe).

  1. पापड भाजी

राजस्थानात पापडची भाजीही खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ती तयार करण्यात फारशी मेहनत लागत नाही. पापडची भाजी अगदी कमी वेळात तयार केली जाऊ शकते.

साहित्य : पापड, अर्धा कप दही, दोन हिरव्या मिरच्या, 2 चमचे तेल, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ.

कृती : पापडची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम दह्यामध्ये हळद, धणे पावडर, मिरची पावडर आणि थोडीसे गरम पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्या. लक्षात ठेवा फ्रिजमधून काढल्यानंतर लगेचच दही वापरू नये, अन्यथा ते फुटू शकेल. तापमान सामान्य झाल्यानंतर त्याचा वापर करा. एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात मेथी दाणे आणि जिरे घाला. 10 सेकंदा परतल्यानंतर हिरवी मिरची आणि दही मिश्रण घाला. ग्रेव्हीसाठी थोडे पाणी घाला आणि भाजी उकळी येईपर्यंत चमच्याने सतत ढवळत राहा. चांगली उकळी आली की त्यात मीठ घाला. या दरम्यान कच्च्या पापडाचे तुकडे करून ग्रेव्हीमध्ये टाका आणि दोन मिनिटे झाकून ठेवा. यानंतर गरमागरम सर्व्ह करा. काही लोक पापड भाजीत दह्याबरोबर टोमॅटो देखील वापरतात. या भाजीला आणखी चविष्ट बनवण्यासाठी वरून थोडीशी कसुरी मेथी घालू शकता.

(Rajasthani Sev Tomato and Papad Sabzi Recipe)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.