Raksha Bandhan Festival Food : रक्षाबंधनसाठी फक्त पाच मिनीटांत बनवा शेवयाची खीर

रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाचे तोंड गोड करते. त्यामुळे बाजारातून अनेक प्रकारची मिठाई आणली जाते. तसेच या दिवशी घरा घरात आवर्जून गोडा-धोडाचे अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र, झटपट तयार होईल अशी एका रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. रक्षाबंधन साठी फक्त पाच मिनिटात तुम्ही शेवयाची खीर तयार करू शकता.

Raksha Bandhan Festival Food : रक्षाबंधनसाठी फक्त पाच मिनीटांत बनवा शेवयाची खीर
वनिता कांबळे

|

Aug 10, 2022 | 11:49 PM

मुंबई : रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा करणार सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाचे तोंड गोड करते. त्यामुळे बाजारातून अनेक प्रकारची मिठाई आणली जाते. तसेच या दिवशी घरा घरात आवर्जून गोडा-धोडाचे अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र, झटपट तयार होईल अशी एका रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. रक्षाबंधन साठी फक्त पाच मिनिटात तुम्ही शेवयाची खीर तयार करू शकता.

साहित्य – भाजलेल्या बारीक शेवया एक वाटी, साखर दोन वाटी, दूध गरजेप्रमाणे अर्धा ते एक लिटर, तूप, वेलची, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, चारोळे, केशर इसेंन्स

शेवयाची खीर तयार करण्याची कृती

अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. अवघ्या पाच मिनिटात तुम्ही शेवयाची खीर तयार करू शकता. यासाठी सर्वप्रथम आपल्या गरजेनुसार अर्धा ते एक लिटर दूध एका जाड बुडाच्या पातेल्यात चांगले गरम करून उकळून घ्या. दुध उकळताना त्यात ज्या प्रमाणात खीर गोड पाहिजे तशा प्रमाणात सारख टाक. यामुळे साखरेचा गोडवा दुधात चांगल्या प्रकारे मिसळला जातो. यानंतर एक कढई अथवा पॅन घ्या. या कढई अथवा पॅन मध्ये भाजलेल्या बारीक शेवया तुपावर सोनेरी रंग येईपर्यंत चांगल्या परतून घ्या. नंतर त्याच तुपामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके, पिस्ता, चारोळे असे सर्व प्रकारचे किशमिश परतून घ्या. यानंतर गरम केलेल्या दुधामध्ये भाजलेल्या शेवया आणि सर्व प्रकारचे किशमिश मिक्स करा. यानंतर यात वेलची पूड आणि केशर इसेन्सचे दोन ते तीन थेंब टाका. साधारण दोन ते तीन मिनिट हे मिश्रण चांगले उकळू द्या. यानंतर ही खीर तुमच्या आवडी प्रमाणे गरम अथवा थंड करुन वाट्यांमध्ये सर्व्ह करा. ही खीर तुमचा रक्षाबंधनाचा जेवणाचा बेत आणखी स्वादिष्ट करेल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें