AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 5 मिनिटे हे आसन करा, एक दोन नव्हे इतके आजार होतील बरे

वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे अनेकांना शारीरिक समस्या येत आहेत. पूर्ण चंद्रासन हे सोपे आणि फायदेशीर योगासन पाठदुखी, तणावापासून आराम देते. हे आसन संतुलन, लवचिकता सुधारते आणि पचनास मदत करते. परंतु, पाठदुखी, हाडांच्या दुखापती किंवा गर्भावस्थेत योगाचार्यांचा सल्ला आवश्यक आहे. 5 मिनिटे नियमित सराव केल्याने आरोग्य लाभ मिळतो.

फक्त 5 मिनिटे हे आसन करा, एक दोन नव्हे इतके आजार होतील बरे
Purna Chandrasana yoga Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 1:29 PM
Share

आजकाल प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम करत आहे. संपूर्ण दिवस एकाच जागी बसून काम करत असल्याने मानसिक व शारीरिकदृष्ट्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार उद्भवत आहेत, अशा स्थितीत तुम्ही घरी योगासने करून स्वतःला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. यासोबतच खानपान योग्य पद्धतीने होत नसल्याने सुद्धा अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दररोज पाच मिनिटे तुम्ही जर हे योगासन केल्यास आरोग्याशी संबंधित होणारे त्रास टाळू शकतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला एका सोप्या योगासनाविषयी सांगणार आहोत जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

पूर्ण चंद्रासन

पूर्ण चंद्रासन नियमित केल्याने शरीराचे रोगांपासून संरक्षण होते. या आसनाचा सराव केल्याने शरीराचे संतुलन, मुद्रा, लवचिकता सुधारते आणि हाडे मजबूत होतात आणि हे आसन एकाग्रता वाढवण्यासही उपयुक्त ठरू शकते. या आसनामुळे शरीरातील पचनाची क्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्हाला पाठदुखी किंवा मणक्याचा त्रास असेल तर योगाचार्यांचा सल्ला घेऊनच पूर्ण चंद्रासन करा. जर तुम्हाला हाडांना दुखापत किंवा ऑस्टिओपोरोसिस असल्यास हे आसन करू नका. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त असाल तसेच गर्भवती महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय पूर्ण चंद्रासन करू नये.

पूर्ण चंद्रासन कसे करावे?

सर्व प्रथम, जमिनीवर सरळ उभे रहा.

नंतर डावा पाय उजव्या पायापासून दोन फूट दूर घ्या.

लक्षात ठेवा, तुम्हाला अजूनही तुमचे हात सरळ ठेवावे लागतील.

आता तुमचे हात आणि पाय हळू हळू त्रिकोणी मुद्रेत घेऊन जा.

आता तुमच्या उजव्या हाताची बोटे जमिनीपासून थोडी वर ठेवा.

तुमच्या उजव्या हाताची बोटे आणि उजव्या पायाची बोटे यामध्ये सुमारे दीड फूट अंतर असावे.

एक हात वरच्या दिशेने हलवा आणि त्याच स्थितीत दुसरा वरच्या दिशेने हलवा.

आता तुमचा डावा पाय हवेत वर करा.

काही सेकंद या स्थितीत राहून पुन्हा सामान्य स्थितीत परत या.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट