AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिल्क पावडरमुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो, कसा बनवावा टॅनिंग रिमूव्हल मास्क?

दुधाच्या पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. मिल्क पावडर फेस मास्कमुळे तुमची त्वचा मऊ आणि स्वच्छ होते तसेच डागही दूर होतात. जर तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर मिल्क पावडर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.

मिल्क पावडरमुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो, कसा बनवावा टॅनिंग रिमूव्हल मास्क?
Milk powder face maskImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 18, 2023 | 6:30 PM
Share

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे या ऋतूत कडक सूर्यप्रकाशामुळे तुमची त्वचा टॅनिंग किंवा काळ्यापणाची शिकार होते. यामुळे अनेकदा संवेदनशील त्वचेच्या लोकांनाही सनबर्नच्या वेदनेला सामोरे जावे लागते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी मिल्क पावडर फेस मास्क घेऊन आलो आहोत. मिल्क पावडर फेस मास्कचा वापर केल्याने तुमच्या त्वचेचे रक्षण होते तसेच सनबर्न आणि टॅनपासून मुक्ती मिळते. दुधाच्या पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. मिल्क पावडर फेस मास्कमुळे तुमची त्वचा मऊ आणि स्वच्छ होते तसेच डागही दूर होतात. जर तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर मिल्क पावडर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते, तर चला जाणून घेऊया मिल्क पावडर फेस मास्क कसा बनवावा.

फेस मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • दूध पावडर दोन चमचे
  • कॉफी पावडर अर्धा चमचा
  • पाणी थोडे
  • खोबरेल तेल एक चमचा

मिल्क पावडर फेस मास्क कसा बनवावा?

  • मिल्क पावडर फेस मास्क बनवण्यासाठी एक छोटी वाटी घ्या.
  • नंतर त्यात दोन चमचे मिल्क पावडर आणि अर्धा चमचा कॉफी पावडर घाला.
  • त्यानंतर त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि थोडे पाणी घालावे.
  • मग तुम्ही या सर्व गोष्टी मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा मिल्क पावडर फेस मास्क तयार आहे.

मिल्क पावडर फेस मास्क कसा वापरावा?

  • मिल्क पावडर फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर चेहऱ्यावर चांगले लावा.
  • मग बोटांच्या साहाय्याने हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा.
  • यानंतर सुमारे 5-7 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करत राहा.
  • त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.