AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rice Flour Scrub | तांदळाचं स्क्रब कसं बनवतात? ते कोणत्या वेळी चेहऱ्याला लावायचं?

फेस स्क्रब हा स्किन केअर रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. घरगुती पद्धतीने हे स्क्रब बनवता येतं. पण हे लावताना याची एक ठराविक वेळ असते. त्याच वेळी हे लावलं गेलं पाहिजे. हे स्क्रब आपण संपूर्ण शरीरासाठी वापरू शकतो, त्याचा चांगला फायदा होतो.

Rice Flour Scrub | तांदळाचं स्क्रब कसं बनवतात? ते कोणत्या वेळी चेहऱ्याला लावायचं?
rice flour scrubImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 26, 2023 | 8:39 PM
Share

मुंबई: संपूर्ण शरीराप्रमाणेच आपण आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेताना आपण सुद्धा जरा गोंधळून जातो. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात खूप गोष्टी उपलब्ध आहेत. या गोष्टी बघूनच आपण गोंधळून जातो. आपल्याला प्रश्न पडतो नेमकं आपण काय वापरलं पाहिजे. मग आपण इंटरनेटवर शोधू लागतो. असंच इंटरनेटवर सर्च करताना आपण अनेकदा पाहिलं असेल की तांदूळ आपल्या त्वचेसाठी खूप चांगला असतो. तांदूळ का? मग तो काय पद्धतीने लावायचा?

स्क्रबिंग करण्याचा एक ठराविक वेळ

त्वचा साफ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची सगळ्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते. फेशियल, स्क्रबिंग, टोनिंग अशी स्टेप बाय स्टेप काळजी घ्यावी लागते. स्क्रबिंग तर बाजारात भरपूर आहेत. पण कोरियन लोकांचं हे तांदळाचं गुपित मात्र आता जगभर पसरलंय. त्यांची त्वचा बघून आता सगळ्यांची इच्छा असते की आपलीही अशी स्किन व्हावी. स्क्रबिंग करण्याचा एक ठराविक वेळ असतो. त्या त्या वेळेला जर ते स्क्रबिंग केलं नाही तर त्याचा इच्छुक परिणाम मिळत नाही. तांदळाच्या पिठाचा वापर करून घरच्या घरी स्क्रब बनवता येतं.

त्वचा जर तेलकट असेल तर…

सकाळी उठल्यानंतर त्वचेची छिद्रे, पोअर्स उघडे असतात. स्क्रब करताना वेळेचं भान असायला हवं. सकाळी उठल्या उठल्या स्क्रब केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 ते 10 मिनिटांच्यावर स्क्रब करू नये. त्वचेवर पिंपल्स असतील तर अजिबात स्क्रब करू नका. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्हाला स्क्रब करायची गरज नाही. अशावेळी ते टाळा. स्किन केअर रुटीन फॉलो करताना स्क्रबिंग हे केलंच पाहिजे.

तांदळाचे पीठ आणि कोरफड

एका भांड्यात 3 चमचे तांदळाचे पीठ घ्या, त्यात कोरफड मिसळा. कोरफडीची पाने नसतील तर जेल मिक्स करा. यानंतर त्वचेला लावा, संपूर्ण शरीराला जरी मसाज केला तरीही फरक दिसेल.

तांदळाचे पीठ आणि दूध

एका भांड्यात 2 चमचे तांदळाचे पीठ आणि दूध घाला. हे स्क्रब चेहऱ्याला लावा आणि ते गोलाकार पद्धतीने मसाज करा. याने चेहऱ्यावर चांगलीच चमक येईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.