Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अगं बाई! जगातील एकमेव गुलाबाचं फूल जे सुकत नाही, रात्रीच बहरतं अन् स्मेल… किमत ऐकून ठसकाच लागेल!

व्हॅलेंटाईन वीकचा पहिला आठवडा रोज डे म्हणून साजरा केला जातोय. बहुतेक प्रेमी युगुल आणि कपल्स आपल्या जोडीदाराला गुलाबाचा पुष्पगुच्छ देणे पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महागडे गुलाब कोणते आहे? त्याची किंमत ऐकून तुम्हाला तुमच्या पायाखालून जमीन घसरत असल्यासारखे वाटेल.

अगं बाई! जगातील एकमेव गुलाबाचं फूल जे सुकत नाही, रात्रीच बहरतं अन् स्मेल... किमत ऐकून ठसकाच लागेल!
Rose DayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 07, 2025 | 1:45 PM

सगळीकडे व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमँटिक वातावरण पाहायला मिळत आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. प्रेमाच्या या आठवड्याचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. गुलाब एक असं फुलं आहे ते सगळ्यांना आवडते. प्रत्येकाच्या घरात आपल्याला एक तरी गुलाबाचं झाड पाहायला मिळेल.त्यात गुलाब म्हंटल कि त्याचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतात. तर रोज डे निमित्त अनेक कपल्स, प्रेमी युगुल आपल्या प्रियकरांना गुलाबाचे पुष्पगुच्छ देण्यास प्राधान्य देतात. पण रोज डेच्या निमित्ताने तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महागडे गुलाब कोणते आहे?

गुलाब त्याच्या सौंदर्य आणि सुगंधासाठी संपूर्ण जगभर ओळखला जातो. एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी कपल्स एकमेकांना गुलाब देतात. गुलाब आणि प्रेम यांचा खोल संबंध आहे. मात्र या लेखात आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागडे गुलाब मानल्या जाणाऱ्या ज्युलियट गुलाबाबद्दल सांगणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालून जमीन घसरत असल्यासारखे वाटेल.

जगातील सर्वात महागडे गुलाब

ज्युलियट रोज हा जगातील सर्वात महागडा गुलाब आहे. अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा हा गुलाब क्वचितच आढळला जातो. प्रसिद्ध फुलविक्रेते डेव्हिड ऑस्टिन यांनी अनेक गुलाब एकत्र करून ज्युलियट रोझची निर्मिती केली. ‘पराग नेशन’ने दिलेल्या वृत्तानुसार, apricot-hued hybrid नावाची ही दुर्मिळ प्रजाती तयार करण्यासाठी त्यांना 15 वर्षे लागली. 2006 मध्ये त्यांनी ते 10 मिलियन पाउंड म्हणजेच 900 कोटी रुपयांना गुलाब विकला.

आता या महागड्या गुलाबाची किंमत किती आहे?

ज्युलियट रोज हे गुलाब इतके महाग आहे की श्रीमंत लोकांनाही ते विकत घेण्यापूर्वी 20 वेळा विचार करायला लावणारा आहे. सध्या याची किंमत 15.8 अमेरिकन डॉलर आहे. भारतीय चलनात ही किंमत 1,38,33,68,063 रुपये आहे. या गुलाबाच्या सुगंधाबद्दल बोलायचे झाले तर त्यात सूक्ष्म चहाचा सुगंध आहे. या गुलाब फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते 3 वर्षे ताजे टवटवीत राहते.

ही फुलं सुद्धा महाग

कुडुपाल फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे गुलाब जगातील महागड्या फुलांपैकी एक मानले जाते. याला भूतफूल असेही म्हणतात. विशेष म्हणजे कुडुपाल फूल रात्रीच बहरते. हे गुलाबाचं फुल तुम्हाला फक्त श्रीलंकेत मिळेल.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.