AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aloe Vera Side Effects | ‘कोरफड’ सेवन करताय? थांबा! ‘या’ गोष्टी जाणून घ्या, अन्यथा वाढू शकते समस्या…

कोरफडचे केवळ फायदेच नाहीत तर, काही तोटे देखील आहेत. ज्याबद्दल लोकांना माहिती नाही.

Aloe Vera Side Effects | ‘कोरफड’ सेवन करताय? थांबा! ‘या’ गोष्टी जाणून घ्या, अन्यथा वाढू शकते समस्या...
aloe vera cultivation
| Updated on: Dec 21, 2020 | 5:47 PM
Share

मुंबई : आयुर्वेदात सुपरफूड ‘कोरफड’चे बरेच फायदे सांगितले गेले आहेत. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात खूप फायदा होतो. यामुळे बरेच लोक रस, भाजी किंवा इतर आणखी प्रकारे कोरफडचे सेवन करतात. जर, आपण देखील कोरफडचे नियमित सेवन करत असाल, तर नक्कीच एखाद्या तज्ज्ञाचे मत घ्या. अन्यथा यामुळे आपली समस्या वाढू शकते. कारण, कोरफडचे केवळ फायदेच नाहीत तर, काही तोटे देखील आहेत. ज्याबद्दल लोकांना माहिती नाही (Side effects of Aloe Vera).

या गोष्टींकडे लक्ष द्या!

– कोरफडचा वापर केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. परंतु, कोरफडमध्ये आढळणारे लेटेक्स कोलायटिस क्रोहन रोग, अॅपेंडिसाइटिस, रक्तस्त्राव, पोटदुखी आणि अल्सर सारख्या समस्या निर्माण करू शकतात. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करू नका.

– कोरफडचे जास्त वेळा किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. यामुळे हृदयाचा गतीमध्ये अनियमितता आणि अशक्तपणा या समस्या होऊ शकतात.

– जर, आपण गॅसच्या समस्येस झगडत असाल, तर कोरफडचे सेवन करू नका. यामुळे अडचणी वाढू शकतात. 12 वर्षाखालील मुलांनी कोरफडचे सेवन करणे टाळले पाहिजे.

– जर, आपण कुठलेही औषधे घेत असाल, तर कृपया कोरफड सेवन करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण कोरफडमध्ये आढळणारे लॅक्टोस औषधांना शरीरात शोषून घेण्यापासून देखील प्रतिबंधित करतो.

– कोरफड रस प्यायल्याने कधीकधी अॅलर्जी, त्वचेवर पुरळ, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर कोरफड रस प्यायल्याने आपल्या मूत्रपिंडाचे नुकसान देखील होऊ शकते.

– कोरफड जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अॅड्रेनालाईनचा त्रास होऊ शकतो, जे हृदयाच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी हानिकारक आहे (Side effects of Aloe Vera).

कोरफडाचे फायदे :

कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो. जगभरात कोरफडीच्या तब्बल 400हून अधिक प्रजाती आढळतात. परंतु, त्यापैकी केवळ 5 प्रजाती वापरल्या जातात. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषणही होते.

(Side effects of Aloe Vera)

हेही वाचा :

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.