Pickle Effect | चटकदार लोणचे खाण्याची सवय पडू शकते महाग, जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान…

Pickle Effect | चटकदार लोणचे खाण्याची सवय पडू शकते महाग, जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान...
लोणच्याचे दुष्परिणाम

आंबा, कैरी, मिरची, गाजर असो वा इतर कोणत्या भाजीचे, लोणचे आपल्या अन्नाचा आनंद द्विगुणित करते.

Harshada Bhirvandekar

|

Jan 25, 2021 | 5:53 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना जेवताना इतर अन्नपदार्थांसोबत ताटाच्या कोपऱ्यात असणारे चटकदार ‘लोणचे’ खाणे प्रचंड आवडते. बहुतेकांच्या रोजच्या आहारात लोणच्याचा समावेश असतोच. आंबा, कैरी, मिरची, गाजर असो वा इतर कोणत्या भाजीचे, लोणचे आपल्या अन्नाचा आनंद द्विगुणित करते. लोणच्याचे चाहते भारतातच नाहीतर, जगाच्या अगदी कुठल्याही कानाकोपऱ्यात आढळतात. परंतु, हे चटकदार लोणचे जर प्रमाणापेक्षा अधिक खाल्ले, तर ते आपल्या शरीरास हानी पोहोचवू शकते. एरव्ही चविष्ठ लागणारे हे लोणचे आपल्या आरोग्यासाठी मात्र अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते (Side effects of Pickle).

लोणच्याचे दुष्परिणाम :

– जास्त लोणचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढू शकते आणि इतर समस्या देखील उद्भवू शकतात. याचे कारण म्हणजे, लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. तसेच, त्यात वापरलेले मसाले हे बऱ्याचदा पूर्णपणे भाजलेले नसतात.

– लोणच्याचा जास्त वापर केल्याने आपल्या पोटातील आम्लता वाढते. तसेच त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अ‍ॅसिडिटी, गॅस, करपट ढेकर येणे सारख्या समस्या उद्भवू शकतात.

– मसाले आणि तेल याप्रमाणेच लोणच्यात मिठाचे प्रमाणही जास्तच असते. सोडियमचा अर्थात मिठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास उच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

– लोणच्याचे नियमित सेवन केल्यास अल्सरची समस्या उद्भवू शकते. याचे कारण म्हणजे त्यात वापरले जाणारे व्हिनेगर. व्हिनेगर हे अल्सरचे मुख्य कारण आहे.

– चटकदार लोणचे बनवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षकांचा वापर केला जातो. हे संरक्षक शरीरासाठी हानिकारक आहेत. ते शरीरात आंबटपणा किंवा जळजळ वाढविण्यासाठी जबाबदार असतात (Side effects of Pickle).

– लोणचे जवळजवळ प्रत्येक घरात उपलब्ध असते.चपाती किंवा पराठा यासोबत लोणचे हमखास खाल्ले जाते. तथापि, जर लोणच्याचा वापर निर्देशांपेक्षा कमी प्रमाणात केला गेला तर, आपल्या शरीरावर नुकसान होण्याची शक्यता कमी होते. तसेच, यामुळे होणाऱ्या संभाव्य आजारांपासूनही तुम्ही सुरक्षित राहू शकता.

लोणचे खाण्याची पद्धत :

जेवढे शिळे लोणचे, तेवढे ते शरीरासाठी घातक असते. जेव्हा प्रत्येक घासाला सोबत आपण लोणचे तोंडी लावतो. त्यामुळे अन्न पचनासाठी लागणारी लाळ तयारच होत नाही. त्यामुळे आपली अन्नपचन होण्याची क्रिया पूर्णतः बिघडून जाते. त्यामुळे आमवाताची समस्या निर्माण होते. आपल्या रक्तात RA चे प्रमाण वाढायला सुरुवात होते. वाताची लक्षणे दिसायला लागतात. एकदा का हा रोग झाला तर पूर्णतः कधीच बरा होत नाही. औषधे घेऊन तुम्ही याला कंट्रोल मध्ये ठेवू शकता.

लोणचे तुम्हाला खायचेच असेल, तर जेवताना कधीच खाऊ नका. जेवण झाल्यानंतर दोन-तीन तासांनी वाटीत घ्या आणि एक-दोन फोडी खा. तेसुद्धा ताजे लोणचे असावे. एकदा लोणचे बनवल्यानंतर दोन-तीन दिवसात ते संपेल एवढेच लोणचे बनवा. हीच लोणचे खाण्याची अतिशय योग्य पद्धत आहे. तुमच्या घरात जर लोणच्याच्या जुन्या भरण्या असतील तर त्या सरळ फेकून द्या. कारण हेच लोणचे तुमच्यासाठी विषाचे काम करीत असते.

(Side effects of Pickle)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें