व्हॉट्सॲपवर नोकरीच्या ताज्या अपडेट्स कशा मिळवायच्या? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नोकरीच्या ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता. यासाठी विशिष्ट जॉब अलर्ट ग्रुप्समध्ये सहभागी व्हा किंवा अधिकृत नोकरीविषयक वेबसाइट्सच्या WhatsApp अलर्ट सेवेला सबस्क्राइब करा. सरकारी व खासगी भरतीची माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल.

नोकरी शोधताय? कौशल्य वाढवायचं आहे? आता तुमच्या व्हॉट्सएपवर स्किल इंडिया असिस्टेंट ( SIA ) नावाचं हे AI-चालित डिजिटल साधन तुम्हाला नोकरी, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाची माहिती देईल. भारत सरकार आणि मेटा यांच्या सहकार्याने सुरू झालेली ही सुविधा ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत प्रत्येकासाठी आहे. फक्त एक मेसेज करा, आणि तुमच्या करिअरची दिशा ठरवा! काय आहे हे स्किल इंडिया असिस्टेंट? आणि यामुळे तुमचं आयुष्य कसं बदलेल? चला, या क्रांतीकारी उपक्रमाची कहाणी जाणून घेऊया!
भारत सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप मंत्रालयाने (MSDE) मेटासोबत हातमिळवणी करत स्किल इंडिया असिस्टेंट (SIA) सुरू केलं आहे. हे AI-चालित डिजिटल साधन व्हॉट्सअॅपवर +91 8448684032 या क्रमांकावर आणि स्किल इंडिया डिजिटल हबवर उपलब्ध आहे. यामुळे लाखो भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण, जवळचे प्रशिक्षण केंद्र आणि नोकरीच्या संधींची माहिती मिळेल. ही जगातील पहिली मोठी अशी योजना आहे, जिथे मेटाच्या मुक्त-स्रोत Llama AI मॉडेलचा वापर राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी केला जात आहे.
स्किल इंडिया असिस्टेंट म्हणजे काय?
स्किल इंडिया असिस्टेंट हा एक AI-चालित चॅटबॉट आहे, जो व्हॉट्सएपवरून वैयक्तिक मार्गदर्शन देतो. यामुळे तुम्ही तुमच्या आवडी आणि गरजेनुसार प्रशिक्षण कोर्सेस, जवळचे प्रशिक्षण केंद्र आणि नोकरीच्या संधी शोधू शकता. हा चॅटबॉट इंग्रजी, हिंदी आणि हिंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, आणि लवकरच मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही येईल. तुम्ही टेक्स्ट किंवा व्हॉइस मेसेजद्वारे याच्याशी संवाद साधू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही “मला IT कोर्सेसबद्दल सांगा” असं विचारलंत, तर हा चॅटबॉट तुम्हाला कोर्सेस, केंद्र आणि नोकरीच्या संधींची यादी देईल.
याचा वापर कसा होतो?
हा चॅटबॉट अनेक क्षेत्रांतील माहिती देतो, जसं की IT, बँकिंग, कृषी, उद्योजकता आणि उत्पादन. याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
* कोर्स शिफारस: तुमच्या आवडी आणि करिअर योजनांनुसार कोर्सेस सुचवतो.
* प्रशिक्षण केंद्र: तुमच्या जवळच्या प्रशिक्षण केंद्रांची माहिती देतो.
* नोकरीच्या संधी: तुमच्या पात्रतेनुसार स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील नोकरींची माहिती पुरवतो.
* इंटरॅक्टिव्ह सपोर्ट: कोर्स सामग्री, व्हिडिओ आणि प्रश्नोत्तरांसाठी 24/7 मदत मिळते.
हा चॅटबॉट मेटा आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ( NSDC ) यांच्या सहकार्याने सर्वम AI ने विकसित केला आहे.
